काही दिवसांपूर्वी नोकियाने आपला Nokia 3310 हा लोकप्रिय फोन पुन्हा लॉन्च केला. त्याला मोबाईल मार्केटमध्ये काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला. जुना फोन पुन्हा आल्याने त्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चाही रंगली. यामध्ये पुढची अपडेट म्हणजे एचएमडी ग्लोबल नोकिया 3310 चे 4G व्हर्जन लाँच करणार आहेत. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अद्याक करण्यात आलेली नाही. याआधी या फोनचे 2G व्हर्जन लाँच झाले होते त्यानंतर सप्टेंबरमध्ये 3G व्हर्जन लाँच करण्यात आले. नोकियाचा हा फोन वेरिएंट युन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

Nokia 3310 च्या 4G वेरियंट फोनमध्ये काही फिचर्स पहिल्यापासूनच आहेत. यात 2.4 इंचाचा QVGA डिस्पले आणि 2 मेगापिक्सलचे LED फ्लॅश रियर कॅमेरा असेल. ड्युल सिम सपोर्ट करणाऱ्या फोनमध्ये ब्लूटूथ, एफएम रेडिओ, मायक्रो SD कार्डचे स्लॉट असेल. त्याचबरोबर यात 1200 mAh ची बॅटरीही देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी एचएमडीच्या नोकिया 3310 च्या 2G वेरिएंट नोकिया सिरीजच्या 30+ ओएस दिले आहे. याच्या 2G वेरिएंट जावा आधारित फिचर ओएस होते. नोकिया 2 अॅनरॉईड ओरियो 8.1 अपडेट होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे. मोबाईल फोनच्या जगात नोकियाचे खास स्थान आहे. 2G आणि फिचर फोन म्हणजे नोकिया अशी ओळख निर्माण करण्यास नोकिया कंपनी यशस्वी झाली आहे.