15 December 2017

News Flash

शांत झोप लागण्यासाठी आता ‘अ‍ॅप’

यात विचारांची साखळी तोडून शांत झोप लागण्याची व्यवस्था आहे असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

पीटीआय, टोरांटो | Updated: June 14, 2016 2:21 AM

‘कॉग्निटिव्ह शफल’ नावाच्या तंत्राचा वापर असलेले झोपेसंबंधीचे उपयोजन (अ‍ॅप) नवीन स्वरूपात तयार करण्यात आले आहे. यात विचारांची साखळी तोडून शांत झोप लागण्याची व्यवस्था आहे असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

मनात भराभर येणारे विचार, काळजी, अनियंत्रित विचार यामुळे झोप लागत नाही असे कॅनडातील सिमॉन फ्रेसर विद्यापीठाचे प्रा. ल्युत ब्युडॉइन यांनी म्हटले असून त्यांनी दोन वर्षांपूर्वीच मायस्लीप बटन नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. आता त्यात सुधारणा केल्या आहेत. नवी आवृत्ती बॉडी स्कॅनसह असून ती लवकरच जारी होईल, संशोधकांनी विद्यापीठातील झोप न येणाऱ्या १५४ विद्यार्थ्यांचा अभ्यास केला.

सीरियल डायव्हर्स इमॅजिनिंग (एसडीआय) ही प्रक्रिया झोपेला जाताना घडते त्यात स्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम तंत्राचाही वापर करता येतो, त्यामुळे पंधरा मिनिटांत झोप येण्यास मदत होते. एसडीआय ही प्रक्रिया झोप येण्यास मदत करते. मानवी मेंदू हा विचार करीत असतो ते थांबवणे फार अवघड असते, पण एसडीआयमुळे त्यात मदत होते. ब्युडॉइन अ‍ॅप हे या समस्येवरचे एक उत्तर आहे.

आता एसडीआयचे डू इट युवरसेल्फ नावाचे नवे रूप वापरात येत आहे. काही असंबद्ध अक्षरांचा संच वापरून व्यक्तिगत पातळीवरही हे तंत्र वापरता येते. हे अ‍ॅप लोकप्रिय होईल  कारण त्यात एसडीआय तंत्राचा वापर केला आहे असे ब्युडॉइन यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

First Published on June 14, 2016 2:21 am

Web Title: now app for calm sleep
टॅग App,Calm Sleep