22 July 2019

News Flash

48MP कॅमेरा, Oppoचा नवीन स्मार्टफोन उद्या येणार बाजारात

मोबाईल कंपन्या दिवसागणिक बाजारात नवनवीन स्मार्टफोन बाजारात दाखल करतात. या स्पर्धेत सध्या शाओमी, सॅमसंग, लावा, नोकीया, सोनी यांसारख्या अनेक कंपन्या आहेत.

मोबाईल कंपन्या दिवसागणिक बाजारात नवनवीन स्मार्टफोन बाजारात दाखल करतात. या स्पर्धेत सध्या शाओमी, सॅमसंग, लावा, नोकीया, सोनी यांसारख्या अनेक कंपन्या आहेत. यामध्ये आणखी एका कंपनीने उडी घेतली आहे. Oppo या कंपनीचा फोन कॅमेरासाठी प्रसिद्ध असून कमी कालावधीत कंपनीने भारतात आपले स्थान निर्माण केले आहे. शुक्रवारी Oppo F11 Pro हा फोन भारतामध्ये लाँच करत असून हा फोन Oppo F 9 ची पुढची आवृत्ती आहे.

Oppo F11 ला ड्युएल कॅमरा सेटअप आहे. आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रायमरी रिअर कॅमेरा तब्बल ४८ मेगापिक्सल आहे. तर १२ मेगापिक्सेलचा सेंकडरी सेन्सर कॅमेरा आहे. याचा सेल्फी कॅमेरा पॉप-अप आहे. हा १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार आहे. Oppo F11 Pro हा स्मार्टफोन Mediatek Helio P70 प्रोसेसरनुसार चालणार आहे. याची बॅटरी 4,000 mAh आहे. १५ तासांपर्यंत बॅटरी चालेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

या फोनचा डिस्प्ले ६.५ इंचांचा एलसीडी आहे. इतर फोनप्रमाणे याला फिंगर प्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे. इंटरनल स्टोरेज १२८ जीबी तर फोनची रॅम ६ जीबी आहे. यामध्ये हायएंड मीडियाटेक चीपसेटही देण्यात आली आहे. या फोनची किंमत 24,990 रूपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएम, स्नॅपडील आणि Oppo storesवर उपलब्ध असणार आहे.

या फोनमध्येही आहे ४८ मेगापिक्सल कॅमेरा

Redmi Note 7 :
नव्या Redmi मालिकेची सुरूवात Redmi Note 7 द्वारा झाली आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स आणि पोट्रेट मोड आहे. रेडमी नोट 7 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरसह अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत असेल.

विवो व्ही १५ प्रो –
२८ हजार ९९० रुपये किंमतीच्या या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह ४८ मेगापिक्सल कॅमेरा, ३२ मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज या फोनमध्ये आहे. ६.३९ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे.

ऑनर व्ह्यू २० –
हा मोबाइल यावर्षी जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज या दोन पर्यायात हा फोन उपलब्ध आहे.

First Published on March 14, 2019 6:57 pm

Web Title: oppo f11 pro with 48mp camera to go on sale for the first time in india tomorrow