Oppo कंपनी लवकरच आपले पहिले स्मार्टवॉच आणणार आहे. अद्याप या स्मार्टवॉचचं नावही समोर आलेलं नाही, पण काही फोटो लीक झालेत. कंपनीकडून हे स्मार्टवॉच Oppo Find X2 Pro या स्मार्टफोनसोबत लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

या वॉचला अँड्रॉइड प्लॅटफॉर्मचा सपोर्ट आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, स्मार्टवॉचमध्ये ECG/EKG सोबत हॉर्ट रेट मॉनिटर हे फीचर असेल. तसेच लॉक करण्यासाठी पासवर्डचा पर्यायही मिळेल. स्मार्टवॉचच्या डिझाइनचे डीटेल्स आणि काही महत्त्वाचे फीचर्स समोर आले आहेत. लीक झालेल्या फोटोवरुन वॉचमध्ये सिलिकॉन स्ट्रीप आणि स्क्रीनवर सेटिंग्स पेज डिस्प्ले होईल. हे वॉच ‘कर्व्ह्ड Edge’ आणि स्क्वेअर-शेप डायलसोबत येईल. या स्मार्टवॉचमध्ये hyperboloid OLED डिस्प्ले असेल. स्क्वेअर शेप डिझाइनमुळे ओप्पो स्मार्टवॉच दिसायला अॅपल वॉचप्रमाणे आहे. स्मार्टवॉचच्या उजव्या बाजूला क्लॉकसोबत सेटिंग्सची स्क्रीनही दिसते. याशिवाय, मल्टीफंक्शन बटण, बॅटरी, पासवर्ड आणि अन्य पर्यायही सेटिंग्स पेजवर उपलब्ध असतील. Oppo स्मार्टवॉच लेदर स्ट्रीप पर्ययामध्येही उपलब्ध असेल. स्मार्टवॉचच्या उजव्या बाजूला 2 फ्लॅट बटण आहेत. याद्वारे UI आणि ओप्पो वॉचचे फीचर्स कंट्रोल करता येतील असं सांगितलं जात आहे.