स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन ‘ओप्पो आर17 प्रो’ चीनमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील तीन कॅमेरे फोनच्या मागील बाजूला तर एक कॅमेरा समोरील बाजूला देण्यात आला आहे. म्हणजेच या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. तीन कॅमेऱ्यांपैकी पहिला कॅमेरा 12 मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा 20 मेगापिक्सल आणि तिसरा TOF 3डी स्टिरीओ कॅमेरा आहे. तर पुढील बाजूस असलेला एकमेव कॅमेरा 25 मेगापिक्सलचा आहे.

फोनमध्ये सुपर वूव टेक्नोलॉजीसह 3700 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून यामुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये 40 टक्के बॅटरी चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असेल. स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच अॅमोलेड फुल एचडी डिस्प्ले(रिझोल्यूशन 1080×2340 पिक्सल)आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.

किंमत –
या स्मार्टफोनची किंमत 4,299 चिनी युआन म्हणजे जवळपास 43 हजार 800 रुपये आहे. ऑक्टोबरमध्ये या फोनची विक्री तेथे सुरू होणार आहे. फोग ग्रेडिएंट कलरमध्ये हा फोन उफलब्ध करण्यात आला आहे. मात्र, हा फोन भारतात नेमका कधी दाखल होणार याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.

स्पेसिफिकेशन –
डिस्प्ले – 6.40 इंच
प्रोसेसर- 2.2 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमेरा – 25-मेगापिक्सल
रिझोल्यूशन-1080×2340 पिक्सल
रॅम – 8 जीबी
ओएस- अॅन्ड्रॉइड 8.1 Oreo
स्टोरेज- 128 जीबी
रिअर कॅमेरा – 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 3700 एमएएच