News Flash

recipe : ४५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पॅन तंदुरी चिकन

घरच्या घरी घ्या अस्वाद..

आपण रोजच्या आहारात चिकनचा समावेश करण्यासाठी पटकन होणाऱ्या आणि मनोरंजक पाककृती शोधत असालतर सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार यांनी दिलेली पॅन तंदुरी चिकनची रेसिपी पाहा..

लागणारा वेळ : 45 मिनिटे
किती व्यक्तींसाठी : 4

साहित्य :

1 पूर्ण चिकन, 10 ते 12 तुकडे केलेले
200 ग्रॅम दही
1 मोठा चमचा सॉल्टेड बटर
1 चमचा हळद
2 मोठे चमचे लिंबाचा रस
2 मोठे चमचे लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
अर्धा चमचा चाट मसाला
आवश्यकतेनुसार मीठ
1 मोठा चमचा आले-लसूण पेस्ट
2 मोठे चमचे तेल

कृती :

1. धारदार सुरीच्या सहाय्याने चिकनच्या तुकड्यांवर थोड्या चिरा पाडा. या तुकड्यांना मीठ व हळद लावा. 15 मिनिटांकरीता ते बाजूला ठेवा.
2. बाऊलमध्ये इतर सर्व साहित्य एकत्र घ्या व त्याचे चांगले मिश्रण तयार करा.
3. चिकनचे तुकडे घेऊन त्यांवर हे मिश्रण लावा.
4. तव्यावर गेल गरम करा व त्यांत हे चिकनचे तुकडे एकाच थरात मांडा.
5. गॅसच्या मोठ्या आचेवर हे तुकडे सर्व बाजूंनी व्यवस्थित परतून घ्या व त्यांना सोनेरी तांबूस रंग येऊ द्या. याला 10 मिनिटे लागतील. चिकनमधील रस यामुळे आटून जाईल.
6. चिकनमधील रस आटल्यावर गॅसची आच मंद करा. तव्यावर झाकण ठेवा. 15 मिनिटे किंवा चिकन चांगले शिजेपर्यंत हे झाकण राहू द्या. झाकण काढून चिकनवर बटरचा थर द्या.
7. चिरलेला कांदा, लिंबू किंवा कांद्याच्या पातीसह हे चिकन वाढा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 5:05 pm

Web Title: pan tandoori chicken recipe in marathi nck 90
Next Stories
1 शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय कराच
2 SBI ची नवीन सेवा लाँच, आता घरबसल्या करा ‘हे’ महत्त्वाचं काम
3 धूम्रपान करत असाल तर विम्याचा विचार कराच कारण…; तज्ज्ञांचा सल्ला
Just Now!
X