Piaggio ने भारतीय बाजारात BS6 इंजिनसह Vespa VXL 149 आणि SXL 149 या दोन स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध झाल्या आहेत. एकीकडे कंपनीने या दोन स्कूटर लॉन्च केल्या आहेत. पण, 150cc क्षमतेच्या SXL आणि VXL मॉडेल्सना वेबसाइटवरुन हटवलं आहे. त्यामुळे लॉन्च केलेल्या नवीन स्कूटर हटवलेल्या स्कूटरसाठी रिप्लेसमेंट असल्याचं सांगितलं जात आहे.

वेस्पा हा इटलीच्या मोटर व्हेइकल ग्रुप पियाजियोचा (Piaggio) ब्रँड आहे. भारतात प्रीमियम ऑटोमॅटिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये कंपनीने आपली छाप पाडली आहे. नवीन SXL 149 ही स्कूटर व्हाइट, मॅट रेड ड्रॅगन, मॅट ब्लॅक, ऑरेंज, अ‍ॅशर ब्लू आणि मॅट येलोअशा सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल. तर, BS6 VXL 149 ही स्कूटर येलो, व्हाइट, रेड, मॅट ब्लॅक आणि अ‍ॅशर प्रोवेन्जा अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. दोन्ही स्कूटर रेट्रो स्टाइलिंग लूकमध्ये असून दोन्हीमध्ये अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. दोन्ही स्कूटरच्या फ्रंटमध्ये 200mm डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये 140mm ड्रम ब्रेक सेटअप आहे. सुरक्षेसाठी दोन्ही स्कूटरमध्ये सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमही (ABS)आहे.

New Era of Tv Samsung launch the world first glare free OLED Two TV with powerful AI features
AI फीचर्ससह सॅमसंगचे ‘हे’ दोन टीव्ही भारतात लाँच; सेटअप बॉक्स लावण्याचीही गरज नाही; किंमत फक्त…
Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य

किंमत :- नवीन SXL 149 ही स्कूटर व्हाइट, मॅट रेड ड्रॅगन, मॅट ब्लॅक, ऑरेंज, अ‍ॅशर ब्लू आणि मॅट येलो अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल. तर, BS6 VXL 149 ही स्कूटर येलो, व्हाइट, रेड, मॅट ब्लॅक आणि अ‍ॅशर प्रोवेन्जा अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. Vespa VXL 149 ची किंमत 1,22,664 रुपये आणि Vespa SXL 149 ची किंमत 1,26,650 रुपये ठेवण्यात आली आहे. या एक्स शोरुम किंमती आहेत.