News Flash

फोटो: महिंद्राच्या ‘माराझो’ गाडीचे भन्नाट फोटो आणि फिचर्स

काही भन्नाट फिचर्स या गाडीच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत

माराझो

देशातील सर्वात मोठी वाहन निर्मिती कंपनी असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्राने आपल्या नवीन गाडीच्या नावाची घोषणा केली. एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) प्रकरातल्या या गाडीचे नाव ‘माराझो’ असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. या गाडीला आधी यू३२१ असे कोडनेम देण्यात आले होते. ‘माराझो’ या शब्दाचा अर्थ बास्क्यू भाषेत शार्क असा होतो. एमपीव्ही प्रकारातील दमदार गाडी म्हणून महिंद्रा या गाडीची जाहीरात करणार असल्याचे समजते.

महिंद्रा अॅण्ड महिंद्राने नावाबरोबरच या गाडीच्या अंतर्गत भागाचे (इंटिरीयरचे) काही फोटोही प्रकाशित केले आहे. यामध्ये गाडीचा डॅशबोर्ड, इन्स्टुमेन्ट क्लस्टर, एसी व्हेन्ट्स आणि सीट दाखवण्यात आले आहेत. यामधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे छताला असलेले एसी व्हेन्ट्स. भारतात अशाप्रकारे मध्यभागी एसी व्हेन्ट्स असलेली ‘माराझो’ ही पाहिलीच गाडी ठरेल.

डॅशबोर्ड हा सेंट्रलाइज कंन्सोल्स असणारा टी शेपमध्ये आहे. डॅशबोर्डवरच ७ इंचाची इन्फोर्मेशन टच स्क्रीन देण्यात आली असून त्यामध्ये अॅपल कारप्ले आणि अॅण्ड्रॉइड ऑटो असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. एक्सयुव्ही ५०० आणि केयुव्ही १०० नंतरही ही महेंद्राची सर्वात प्रिमियम कार असणार आहे. नावाला साजेसे डिझाइन करण्याच्या दृष्टीने या गाडीचे डिझायनिंग करताना त्यामध्ये शार्क ग्रील्स, शार्कच्या शेपटीच्या आकाराचे टेल लाइट्स, शार्क फीन अॅण्टीना असे भन्नाट लुक्स देण्यात येणार असल्याचे समजते. या गाडीमध्ये १.६ लीटरचे डिझेल इंजिन असेल. या गाडीमध्ये सहा ऑटो गेअर किंवा सहा मॅन्यूअल गेअरबॉक्स असतील.


डॅशबोर्ड हा सेंट्रलाइज कंन्सोल्स असणारा टी शेपमध्ये आहे


अॅपल कारप्ले आणि अॅण्ड्रॉइड ऑटो असे दोन्ही पर्याय


सेंट्रलाइज प्रकाराचे एसी व्हेन्ट्स असलेली ‘माराझो’ ही पाहिलीच गाडी


गाडीचे सीट


शार्कच्या शेपटीच्या आकाराचे टेल लाइट्स


नावाला साजेसे डिझाइन करण्याच्या प्रयत्न


शार्क फीन अॅण्टीना


रेनॉल्टच्या लॉगी या गाडीशी स्पर्धा करणार माराझो

किंमत किती असणार

या गाडीची किंमत किती असेल या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असले तरी प्राथमिक माहितीनुसार ही गाडी १० ते १५ लाखांच्या दरम्यान असेल. महिंद्राच्या सर्वच एमपीव्ही या १० ते १५ लाखांच्या दरम्यानच असल्याने ही गाडीही त्याच किंमतीत उपलब्ध करुन देण्यात येईल. म्हणजेच महिंद्राची माराझो बाजारात लॉन्च होईल तेव्हा रेनॉल्टच्या लॉगी या गाडीशी स्पर्धा करेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 5:14 pm

Web Title: pics upcoming mahindra marazzo mpv interiors revealed design features explained
Next Stories
1 सॅमसंगचा मोबाईल वापरताय? मग हे वाचाच
2 BSNL चे ९ आणि २९ रुपयांचे आकर्षक प्लॅन दाखल
3 Samsung Galaxy Note 9 launch: सॅमसंगचा गॅलेक्सी नोट ९ लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Just Now!
X