Poco X2 हा स्मार्टफोन आता महाग झाला आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत वाढ केली आहे. हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध असून त्यापैकी दोन व्हेरिअंटच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर, टॉप व्हेरिअंटच्या किंमतीत अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. फ्लिपकार्ट आणि पोकोच्या वेबसाइटवर नवीन किंमत अपडेट करण्यात आली आहे. Poco X2 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर असून हा फोन खास गेमिंगसाठी डिझाइन करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप तर सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप असे एकूण सहा कॅमेरे आहेत. दमदार प्रोसेसरशिवाय 6.67 इंच फुल एचडी+ रिअलिटी फ्लो 120Hz डिस्प्लेमुळे गेमिंगचा दर्जेदार अनुभव मिळतो. फोनच्या 3D कर्व्ड बॅक डिझाइनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे.

फीचर्स आणि ऑफर्स:-
अँड्रॉइड 10 ओएसवर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर Adreno 618 GPU आणि 8 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आहे. पोकोचा हा स्मार्टफोन रिअर क्वॉड कॅमेरा सेटअपसोबत येतो. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे, तर 2 +8 +2 मेगापिक्सलचे अन्य तीन सेंसर आहेत. स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील 20 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि आयआर ब्लास्टर आहे. या फोनला लेटेस्ट अँड्रॉइड 11 चे अपडेटही मिळेल असंही कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय 4,500mAh ची बॅटरी फोनमध्ये असून 68 मिनिटांमध्ये 0 ते 100 टक्के चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. अ‍ॅटलांटिस ब्लू, मॅट्रिक्स पर्पल आणि फीनिक्स रेड या तीन रंगांचे पर्यायटलांटिस ब्लू, मॅट्रिक्स पर्पल आणि फीनिक्स रेड या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.

किंमत:-
पोको X2 च्या 6GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज या दोन मॉडेलच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या महिन्यात स्मार्टफोनवरील जीएसटी दर वाढल्याने कंपनीने तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत 1000 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे आता 6GB रॅम + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपये झाली आहे. याशिवाय, 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आता 18,499 रुपये मोजावे लागतील. तर, 8GB रॅम + 256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिअंटच्या किंमतीत मात्र अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. या मॉडेलची किंमत 20,999 रुपये इतकी आहे.