Google pixel XL फोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. हा फोन बाजारात ७६ हजार रुपयांना आहे. मात्र त्याची किंमत कमी करुन तो ३९,९९९ रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासोबत Pixel 2XL च्या किंमतीतही कपात करण्यात आली असून हा फोन फ्लिपकार्टवर ४९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. Xiomi चा MI Mix 2 या प्रीमिअम स्मार्टफोनही ३ हजार रुपयांनी स्वस्त मिळत असून सध्या तो बाजारात ३२,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या पर्यायांचा नक्कीच विचार करु शकता.

Pixel 2 ला ५ इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर Pixel 2 XL मध्ये ६ इंच आकाराची स्क्रीन आहे. हे दोन्ही फोन ६४ जीबी आणि १२८ जीबी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आणि 4GB रॅम देण्यात आली आहे.

याबरोबरच शिओमीने काही महिन्यांपूर्वी बाजारात दाखल होत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. Xiomi चा MI Mix 2 ची स्क्रीन ५.९९ इंच आकाराची असून फोनची रॅम ६ जीबी असेल. या फोनमध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच या फोनला १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेराही देण्यात आला असून फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. याची बॅटरी ३४ हजार मिलीअॅम्पियर्सची आहे.