News Flash

सोरायसिस रुग्णांनी घ्या केसांची ‘ही’ खास काळजी

अशी घ्या केसांची काळजी

डॉ. रिंकी कपूर
सध्याच्या काळात प्रदूषण ही मोठी समस्या झाली आहे. अनेक कंपन्यामधून निघणारं विषारी पाणी, वायू हे थेट हवेत आणि नदीत सोडले जातात. त्यामुळे सध्याच्या घडीला वायूप्रदूषण, जलप्रदूषण ही मोठी समस्या असल्याचं पाहायला मिळतं. या प्रदूषणामुळे त्याचा परिणाम हा त्वचेवर आणि केसांवर होत असतो. त्यामुळे बऱ्याचवेळा काही जण त्वचाविकार किंवा केसांच्या समस्येने त्रस्त असतात. यात सोरायसिस असलेल्या व्यक्तींना त्वचेची आणि केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. म्हणूनच सोरायसिस असलेल्या व्यक्तींनी केसांची कशी काळजी घ्यावी हे पाहुयात.

१. केस हलक्या हाताने विंचरा. त्यावर जास्त ताण देऊ नका.

२. केसांसाठी बाजारात असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यांदित करा. त्यामुळे केस गळण्याची शक्यता असते.

३. कोणतीही हेअरस्टाइल करताना योग्य कॉस्मॅटिक्सचा वापर करा.

४. हेअर कलर करण्यापूर्वी दोन दिवस आधी आणि कलर केल्यानंतर दोन दिवस शॅम्पूचा वापर करु नका.

५. केसांच्या मुळाशी तेलाने हलक्या हाताने मालिश करा.

६. संतुलित आहार आणि व्यायामाला प्राधान्य द्या.

(लेखिका डॉ. रिंकी कपूर या द एस्थेटिक क्लिनिक्स’मध्ये डरमॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आहेत.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 6:31 pm

Web Title: psoriasis hair diseases ssj 93
Next Stories
1 पावसाळ्यात होणाऱ्या ‘या’ आजारांविषयी माहित आहे का?
2 सोरायसिसच्या समस्येने त्रस्त आहात? मग घ्या त्वचेची ‘ही’ काळजी
3 आजी बाईचा बटवा! सर्दी-खोकल्यावर घ्या हे घरगुती काढे
Just Now!
X