रिअलमी कंपनीने मंगळवारी (दि. 18) भारतात आपले दोन नवीन बजेट स्मार्टफोन Realme C15 आणि C12 लाँच केले. या दोन स्मार्टफोनसोबतच कंपनीने Realme Buds Classic इयरबड्स लाँच केले आहेत. ब्लूटूथ वायरलेस हेडसेटऐवजी वायर्ड इयरफोन वापरणाऱ्यांसाठी Realme Buds Classic इयरबड्स चांगला पर्याय आहे.

कंपनीने गेल्या वर्षी 599 रुपयांमध्ये Realme Buds 2 लाँच केले होते. तर आता Realme Buds Classic त्यापेक्षा कमी किंमतीत आणले आहेत. 399 रुपये इतकी रिअलमी बड्स क्लासिकची किंमत असून 24 ऑगस्टपासून रिअलमीच्या आणि अ‍ॅमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटवरुन ते खरेदी करता येतील. Realme Buds 2 प्रमाणे रियलमी बड्स क्लासिक मध्येही मॅग्नेटचा समावेश करण्यात आलेला नाही. नवीन इयरबड्सची डिझाइनही बरीच वेगळी आहे. आकाराने गोल असलेले हे इयरबड्स कानांमध्ये सहज फिट होतात असा कंपनीचा दावा आहे.

ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हे इयरबड्स उपलब्ध असतील. रिअलमीने या वायर्ड इयरबड्समध्ये 14.2mm ऑडिओ ड्राइवर दिले असून HD माइक्रोफोन आहे. खिशातून फोन बाहेर न काढताही याद्वारे म्युझिक प्ले-बॅक कंट्रोल किंवा कॉल कंट्रोल करता येतात. इयरफोनच्या केबलची गुंतागुंत होऊ नये व केबल सहज फोल्ड करुन ठेवता यावी यासाठी ‘केबल ऑर्गनाइज स्ट्रॅप’ देखील कंपनीकडून दिले जात आहे. याशिवाय यामध्ये 3.5mm कनेक्टर आहे. यासोबतच कंपनीने दोन नवीन बजेट स्मार्टफोन Realme C15 आणि C12 लाँच केले आहेत. Realme C12 ची किंमत कंपनीने 8,999 रुपये ठेवली आहे. तर, Realme C15 ची किंमत 9,999 रुपयांपासून सुरू होते.

आणखी वाचा :- (तब्बल 6000mAh ची बॅटरी; रिअलमीने लाँच केले दोन दमदार ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत फक्त…)