रिअलमी कंपनीने या महिन्यातच आपला Realme C11 हा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी या फोनसाठी कंपनीने  भारतात पहिल्यांदाच ‘फ्लॅश सेल’चं आयोजन केलं होतं. त्या सेलमध्ये अवघ्या दोन मिनिटांतच 1.5 लाखांहून जास्त Realme C11 फोनची विक्री झाली, असा दावा कंपनीने केला. त्यानंतर आज(दि.29) पुन्हा एकदा हा फोन सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या फोनच्या खरेदीवर सेलमध्ये काही आकर्षक ऑफरही आहेत.

सेल आणि ऑफर:-
Realme C11 च्या विक्रीसाठी कंपनीने फिल्पकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाइटवर ‘फ्लॅश सेल’ ठेवला आहे. दुपारी 12 वाजेपासून या सेलला सुरूवात होईल. एसबीआयच्या क्रेडिट कार्डने हा फोन खरेदी करणाऱ्यांना पाट टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तर,  ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’ आणि ‘अ‍ॅक्सिस बॅक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे फोन खरेदी करणाऱ्यांना पाच टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय नऊ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील ग्राहकांसाठी आहे.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

फीचर्स :-
कंपनीने Realme C11 हा नवीन बजेट स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात मलेशियामध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये AI फीचरही दिले आहे.  रियलमी सी11 मध्ये 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ असून 2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर दिले आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला मेमरी कार्डचाही सपोर्ट आहे. अँड्रॉइड 10 बेस्ड रिअलमी यूआयवर आधारित हा फोन ड्युअल-सिम कार्डला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा प्रायमरी तर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. कॅमेऱ्यात AI ब्यूटी, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत. तसेच, फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत. 29 जिलै रोजी हा सेल पुन्हा एकदा फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असणार आहे.

Realme C11 किंमत : 
रिअलमी सी11 या नवीन फोनची किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.