दोन महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या ‘रियलमी एक्स-२ प्रो’ या रियलमीच्या पहिल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी नवीन व्हेरिअंटची घोषणा करण्यात आली आहे. सध्या भारतात हा स्मार्टफोन केवळ दोन व्हेरिअंटमध्ये (8GB रॅम आणि 12GB रॅम) उपलब्ध आहे. पण आता लवकरच या स्मार्टफोनसाठी 6GB रॅम व 64GB स्टोरेजसह नवीन व्हेरिअंट लाँच केले जाणार आहे. म्हणजे यापुढे हा स्मार्टफोन 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज अशा तीन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

यात दर्जेदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून मागील बाजूला असलेला चार कॅमेऱ्याचा सेटअप याचं वैशिष्ट्य आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये दर्जेदार टचसाठी 135Hz टच सॅम्पलिंग आहे. गेमिंगसाठी यामध्ये लिक्विड कूलिंग फीचर आहे. 50W VOOC फास्ट चार्जिंगसह 4,000mAh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये दर्जेदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 6.5-इंच फुल-HD+(2400 x 1080 पिक्सल) सुपर AMOLED डिस्प्ले यात आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 64MP क्षमतेचा आहे. तर अन्य कॅमेरे अनुक्रमे 8MP क्षमतेचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 13MP क्षमतेचा टेलीफोटो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. याशिवाय फोनमध्ये अपडेटेड इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरचा वापर करण्यात आला आहे. रिअलमीने या फोनमध्ये Dolby Atmos सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर सेटअप दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड WiFi असून ColorOS 6.1 वर स्मार्टफोन कार्यरत असेल. याशिवाय सेल्फीसाठी यामध्ये 16 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे.

किंमत – 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये
  8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये
12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये