13 August 2020

News Flash

Recipe: रात्री उरलेल्या भाताच्या बनवा कुरकुरीत ‘भातोडया’

उरलेला भात प्रत्येक घरात असतोच, फोडणीचा भात नेहमीच होतो, फ्राइड राइस, पुलाव; पण...

शुभा प्रभू-साटम

उरलेला भात प्रत्येक घरात असतोच, फोडणीचा भात नेहमीच होतो, फ्राइड राइस, पुलाव; पण आज पाहुयात एक वेगळीच रेसिपी भातोडय़ा.

साहित्य –
उरलेला भात (चिकटसर असल्यास बरा, किंवा किंचित पाणी लावून घ्या)

उकडलेला बटाटा

भाजून बेसन

हिरवी मिरची

आले लसूण

कोथिंबीर वाटून

मीठ आणि साखर.

हे अगदी बेसिक. आता यात तुम्हाला हवे ते घालू शकता. म्हणजे मसाला आणि अन्य साहित्य

कृती –

भात, बटाटा आणि बेसन आणि जे घालणार ते सर्व व्यवस्थित मळून घ्या.

हे मिश्रण चिकटसर असल्यास त्यात रवा घालावा.

मळून झाल्यानंतर या मिश्रणाचे चपटे वडे करून शॅलो फ्राय करावेत. लालसर रंग येईपर्यंत मंद आचेवर तेलात तळावेत.

शक्यतो तळणे करू नये कारण ते खूप तेल पितात.

हे कुरकुरीत वडे पावसात खायला मस्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 5:44 pm

Web Title: recipe rice patties with leftover rice scsg 91
Next Stories
1 Jio ने पुन्हा आणली ‘ती’ ऑफर, ‘फ्री’मध्ये मिळतोय 2GB एक्स्ट्रा डेटा
2 फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी खाताय? सावधान!
3 Realme चे अजून दोन फोन झाले महाग, कंपनीने वाढवली किंमत
Just Now!
X