नोकरीची संधी

सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन (KVIC), (मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मीडियम इंटरप्रायझेस, भारत सरकार) मुंबई (जाहिरात क्र. KVIC/Adm./Recruitment (UR/OBC/EWS)/2(30)/2019-20)

ग्रुप-बी व ग्रुप-सी पदांची भरती.

(१) ग्रुप-सी पदे (पे मॅट्रिक्स लेव्हल-२)

वेतन दरमहा अंदाजे रु. ३०,०००/-.

(i) असिस्टंट (व्हिलेज इंडस्ट्रीज) – एकूण १५ पदे (इमाव – २, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १०)

पात्रता – (दि. १९ जानेवारी २०२० रोजी) इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.

(ii) असिस्टंट (खादी) – एकूण ८ पदे

(इमाव – ३, खुला – ५)

पात्रता – टेक्स्टाइल इंजिनीअरिंग / टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी / फॅशन टेक्नॉलॉजी / हँडलूम टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा.

(iii) असिस्टंट (ट्रेनिंग) – एकूण ३ पदे

(इमाव – १, खुला – २)

पात्रता – इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.

(इष्ट पात्रता – किमान ३ महिने कालावधीचा खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनकडील सर्टिफिकेट कोर्स).

(२) ग्रुप-सी पदे (पे मॅट्रिक्स लेव्हल-४)

वेतन अंदाजे रु. ४०,०००/- दरमहा.

(i) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (FBAA) – ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १)

पात्रता – बी.कॉम.

(इष्ट पात्रता – एम.कॉम./एम.बी.ए. (फायनान्स)/सी.ए./आयसीडब्ल्यूए).

(ii) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Adm & HR) – १५ पदे (इमाव – १५)

पात्रता – पदव्युत्तर पदवी किंवा पदवी आणि ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.

(३) ग्रुप-सी पदे (पे मॅट्रिक्स लेव्हल-५)

वेतन दरमहा अंदाजे रु. ४५,०००/-.

(i) एकक्झिक्युटिव्ह (व्हिलेज इंडस्ट्रीज) – ५६ पदे (इमाव – १९, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३०)

पात्रता – इंजिनीअरिंग पदवी किंवा एम.एस्सी. किंवा एम.बी.ए. (बी.एस्सी. पदवी असावी.)

(ii) एक्झिक्युटिव्ह (खादी) – ६ पदे

(इमाव – २, खुला – ४)

पात्रता – टेक्स्टाइल इंजिनीअरिंग/फॅशन टेक्नॉलॉजीमधील पदवी.

(४) ग्रुप-बी पदे (पे मॅट्रिक्स लेव्हल-६)

अंदाजे वेतन दरमहा रु. ५४,०००/-.

(i) सीनियर एक्झिक्युटिव्ह (इकॉनॉमिक रिसर्च) – २ पदे (खुला)

पात्रता – इकॉनॉमिक्स / स्टॅटिस्टिक्स / कॉमर्स (स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्स विषयांसह) मधील पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा – दि. १९ जानेवारी २०२० रोजी

ग्रुप-सी पदांसाठी २७ वर्षेपर्यंत आणि ग्रुप-बी पदांसाठी ३० वर्षेपर्यंत (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत.)

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/-. (अजा/अज/विकलांग/महिला यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती – सर्व पदांसाठी जनरल अ‍ॅप्टिटय़ूड कॉम्प्युटर बेस्ड् ऑनलाइन टेस्ट (जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग – ३५ प्रश्न, जनरल अवेअरनेस – ३५ प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ३५ प्रश्न, इंग्लिश लँग्वेज – १५ प्रश्न; प्रत्येकी १ गुण, एकूण १२० प्रश्न, १२० गुण)

अंतिम निवड ऑनलाइन टेस्टमधील कामगिरीवर आधारित केली जाईल.

उमेदवार ग्रुप-सी किंवा ग्रुप-बीमधील एका पदासाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज www.kvic.org.in या संकेतस्थळावर दि. १९ जानेवारी २०२० (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक.

हेल्प डेस्क क्र. ०२२- ६८२०२७४४ (कामकाजाच्या दिवशी १०.०० ते १७.००वाजेपर्यंत)

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL), (डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जीअंतर्गत पब्लिक सेक्टर एंटरप्राइज)  (जाहिरात क्र. TMS/HRM/TA/2020) आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस’च्या एकूण ८० पदांची तारापूर अ‍ॅटॉमिक पॉवर स्टेशन येथे भरती.

(१) फिटर – १० पदे,

(२) टर्नर – ५ पदे,

(३) इलेक्ट्रिशियन – ८ पदे,

(४) वेल्डर – ८ पदे,

(५) इलेक्ट्रॉनिक्स – ३ पदे,

(६) इन्स्ट्रमेंटेशन मेकॅनिक – ५ पदे,

(७) रेफ्रिजरेशन अँड एसी मेकॅनिक – ५ पदे,

(८) कारपेंटर – ६ पदे,

(९) प्लंबर – ६ पदे,

(१०) वायरमन – ७ पदे,

(११) डिझेल मेकॅनिक – ३ पदे,

(१२) मशिनिस्ट – ५ पदे,

(१३) पेंटर – १ पद,

(१४) मेसॉन – १ पद,

(१५) इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स – ७ पदे.

एकूण ८० पदे. (अजा – ८, अज – ७, इमाव – २१, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३३, विकलांग – ३).

पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण.

अ‍ॅप्रेंटिसशिपचा कालावधी – १ वर्षांचा असेल.

वयोमर्यादा – दि. २१ जानेवारी २०२० रोजी

१६ ते २४ वर्षे (इमाव – २७ वर्षेपर्यंत,

अजा/अज – २९ वर्षेपर्यंत,

विकलांग – ३४ वर्षेपर्यंत).

शारीरिक मापदंड – उंची – १३७ सें.मी.

वजन -२५.४ कि.ग्रॅ. छाती – किमान ३.८ सें.मी. छाती फुगविता येणे आवश्यक.

इच्छुक उमेदवारांनी  http://apprenticeship.gov.in या वेब पोर्टलवर आपले नाव रजिस्टर करावे. ज्यांनी आपले नाव  http://apprenticeship.gov.in या पोर्टलवर रजिस्टर केले आहे त्यांनी संबंधित ट्रेडसाठी Establishment Registration No. kE06172702965l (NPCIL तारापूर महाराष्ट्र साइट) मधून अर्ज करावा. अर्जासोबत फोटो व सही, आधारकार्ड, आयटीआयच्या सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका (व्हर्टकिल मोडमध्ये पीडीएफ फाइलमध्ये स्कॅन करून), जातीचा दाखला स्कॅन करून अपलोड करावेत.

ऑनलाइन अर्ज  www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर दि. २१ जानेवारी २०२० (१६.०० वाजे)पर्यंत करावेत.