25 November 2020

News Flash

Redmi 6A चा सेल सुरु; एकाहून एक आकर्षक ऑफर्स

नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उत्तम संधी आहे. 

शाओमी कंपनीचा सर्वात स्वस्त आणि मस्त फोन म्हणून ओळख असलेल्या Redmi 6A या फोनवर आज सेल आहे. हा सेल www.mi.com आणि www.amazon.in वर आहे. यामध्ये कंपनीने अनेक ऑफर्स दिल्याने ग्राहकांना हा फोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहे. रिलायन्स जिओच्या युजर्सना या फोनवर २२०० रुपयांची कॅशबॅक देण्यात येणार आहे. हे कॅशबॅक रिचार्ज व्हाऊचरच्या स्वरुपात मिळणार आहे. याबरोबरच १०० जीबी जास्तीचा डेटाही मिळणार आहे. mi.com वरुन खरेदी केल्यास ५४९ रुपयांमध्ये अपघातकालिन आणि लिक्विड डॅमेज दिला जाणार आहे. ३ महिन्यांसाठी हंगामा म्युझिकचे मोफत सबस्क्रीप्शन मिळणार आहे. याशिवाय आपला जुना फोन देऊन हा फोन खरेदी करण्याची सुविधाही आहे. यामध्ये कोणत्या मॉडेलवर किती डिस्काऊंट मिळेल याची माहिती साईटवर देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनला ५.४५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आहे. 13 मेगापिक्सल सिंगल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. रेडमी 6ए मध्ये एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेंसर आहेत. या फोनला 3000 मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. Redmi 6A च्या 16 जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत 5,999 रुपये आहे, तर 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये आहे. दोन्ही व्हेरिअंट्समध्ये 2 जीबी रॅम असून मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. त्यामुळे तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 12:53 pm

Web Title: redmi 6a sale many exciting offers on model from company
Next Stories
1 …म्हणून रिकाम्यापोटी व्यायाम करु नका
2 जिओला टक्कर, एअरटेलचा १९५ रूपयांचा जबरदस्त प्लॅन
3 पेटीएम होणार सुरक्षित, फेस लॉगइन फिचर लवकरच
Just Now!
X