15 October 2019

News Flash

शाओमीचं दुसरं गिफ्ट, या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमतीत 4 हजारांची कपात

भारतात पाच वर्ष पूर्ण करणाऱ्या चिनच्या स्मार्टफोन निर्मात्या शाओमी कंपनीने ग्राहकांना पाच 'गिफ्ट' देण्याचं जाहीर केलं होतं.

भारतात पाच वर्ष पूर्ण करणाऱ्या चिनच्या स्मार्टफोन निर्मात्या शाओमी कंपनीने ग्राहकांना पाच ‘गिफ्ट’ देण्याचं जाहीर केलं होतं. कंपनीने आता आपल्या दुसऱ्या गिफ्टबाबत घोषणा केलीये. शाओमी Mi A2 नंतर कंपनीने Redmi Note 5 Pro च्या किंमतीमध्ये कपात केली आहे. या फोनवर 4 हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे.

शाओमी रेडमी नोट 5 प्रोच्या 4 जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत आधी 15 हजार 999 रुपये होती, मात्र आता हा स्मार्टफोन 12 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 6 जीबी रॅमच्या व्हेरिअंटची किंमत आधी 17 हजार 999 रुपये होती आता हा स्मार्टफोन 13 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.


ट्विटरद्वारे कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये आतापर्यंत Redmi Note 5 Pro च्या 1 कोटी युनिट्सची विक्री झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीकडून 7 ते 11 जानेवारी दरम्यान पाच गिफ्ट देण्याची घोषणा करण्यात आली होती.

First Published on January 8, 2019 2:12 pm

Web Title: redmi note 5 pro price cut