News Flash

Redmi Note 9 Pro खरेदी करण्याची अजून एक संधी, दमदार डिस्काउंटसह आज पुन्हा सेल

'शाओमी'चा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याची अजून एक संधी...

शाओमीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Redmi Note 9 Pro खरेदी करण्याची तुमच्याकडे अजून एक संधी आहे. कारण, आज पुन्हा या स्मार्टफोनसाठी कंपनीने विशेष सेलचं आयोजन केलं आहे. आज (दि.6) दुपारी 12 वाजेपासून कंपनीची अधिकृत वेबसाइट mi.com आणि इ-कॉमर्स कंपनी Amazon च्या संकेतस्थळावर या फोनसाठी सेलला सुरुवात झाली आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. तसेच यामध्ये 48MP प्रायमरी सेंसर आणि 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे.

सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. ICICI बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डवर किंवा इएमआयवर हा फोन खरेदी केल्यास कंपीकडून 1,000 रुपये डिस्काउंट मिळेल. सरकारकडून फक्त ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच डिलिव्हरीची परवानगी मिळाली असल्याने रेड झोनमधील ग्राहकांना हा फोन सध्यातरी विकत घेता येणार नाही.

रेडमी नोट 9 प्रो स्पेसिफिकेशन्स : दोन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात आलेला Redmi Note 9 Pro ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे.

किंमत : रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंट)ची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय सेलमध्ये 1,000 रुपये डिस्काउंट मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 12:59 pm

Web Title: redmi note 9 pro to go on sale again via mi com amazon know price in india offers specifications and all details sas 89
Next Stories
1 प्रतीक्षा संपणार! अखेर WhatsApp ची ‘ही’ सर्व्हिस होणार लॉन्च
2 5G सपोर्टसह तब्बल 108 MP कॅमेरा, किती असणार Xiaomi Mi 10 ची भारतातील किंमत?
3 ‘आरोग्य सेतू मित्र’ वेबसाइट लॉन्च, घरबसल्या मिळणार डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय सुविधाही
Just Now!
X