26 January 2020

News Flash

Reliance AGM 2019 : पाच सप्टेंबर रोजी जिओ फायबर लाँच होणार, ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू

बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवा, जिओ फोन ३, जिओ सेटटॉप बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा

मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.  यात बहुप्रतिक्षित जिओ फायबर, जिओ फोन ३, जिओ सेट टॉप बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुकेश अंबानी यांनी आपल्या शेअर होल्डरला (समभागधारक)संबोधित केले. यावेळी त्यांनी रिलायंस कंपनीच्या वाटचाल आणि यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच सौदी अरॅमकोशी तेलाच्या क्षेत्रात रिलायन्सची भागीदारी झाल्याची माहिती यावेळी दिली. सौदी अरॅमको कंपनी रिलायन्समध्ये २० टक्के गुंतवणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले.  साऊदी अरामको रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

रिलायंस भारतामध्ये सर्वाधिक जीएसटी आणि आयकर भरणारा उद्योग समुह ठरल्याचे मुकेश अंबानी यांनी सर्वसाधारण सभेमध्ये म्हटलेय.  जिओनं गेल्या वर्षभरात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जिओचं योगदान मोठं आहे. जिओने भारतामध्ये ३२ टक्के व्यवसायावर आपलं वर्चस्व स्थापन केल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

Live Blog

12:04 (IST)12 Aug 2019
जिओ फायबरचे प्लॅन ७०० रुपयांपासून

अमेरिकेत ९० एमबीपीएस स्पीड आहे. जिओचा स्पीड १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएसपर्यंत आहे. जगातील सगळ्यात बेस्ट ब्राँडबँड असल्याचे अंबानी यांनी यावेळी सांगितले. जागतिक बाजाराच्या तुलनेत एक दशांश किमतीत सेवा उपलब्ध आहे. ७०० ते १०,००० रुपये प्रति महिना टेरीफ प्लान उपलबद्ध आहेत. सगळे व्हॉइस कॉल्स फ्री, अनलिमिटेड इंटरनॅशनल कॉल अमेरिका व कॅनडा ५०० रुपये प्रति महिना. जिओ फायबरमध्ये बहुतेक सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहेत.

12:02 (IST)12 Aug 2019
पाच सप्टेंबर रोजी जिओ फायबर लाँच होणार, ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू

पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात आली.

12:00 (IST)12 Aug 2019
फस्ट डे फस्ट शो

घरी बसून चित्रपटगृहात लागलेला चित्रपट पाहू शकता. रिलायंस 'फस्ट डे फस्ट शो' घेऊन येत आहे. २०२० च्या जूनपर्यंत लोकांपर्यत पोहचण्याची शक्यता मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली

11:56 (IST)12 Aug 2019
घरी बसून ट्राय करा कपडे

ऑनलाइन खरेदी करताना कपड्यांचा अंदाज येत नाही. मात्र, रिलायंसने एमआर(MR)नावाचा डिव्हास आणला आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन कपडे परिधान करू शकता.

11:52 (IST)12 Aug 2019
सेटअप बॉक्सची घोषणा

रिलायंसकडून जिओ सेटअप बॉक्सची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. जगामध्ये कुठेही बसून मित्रांसोबत गेम खेळू शकता

11:48 (IST)12 Aug 2019
जिओ गिगा फायबरची घोषणा

Reliance Jio GigaFiber या बहुप्रतिक्षित ब्रॉडबँड सेवेबाबत प्रतीक्षा संपली आहे. कंपनीकडून आज मुंबईतील वार्षिक सभेत या सेवेची घोषणा केली.  गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु  होती. पाच लाख घरांमध्ये सध्या या सेवेचा वापर केला जात आहे. १०० जीबी पेक्षा जास्त डेटा यामध्ये वापरला जात आहे.  यासोबत लँडलाइन सेवाही मिळणार आहे.

11:43 (IST)12 Aug 2019
'होम ब्रॉडबँड'ची घोषणा

मुंबईतील सुरू असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायंसकडून 'होम ब्रॉडबँड'ची घोषणा करण्यात आली. यावेळी याचा डेमोही देण्यात आला. बाजारातील सुत्रांनुसार, या सेवेद्वारे एअरटेलला कडवी टक्कर देण्याचा रिलायन्सचा प्रयत्न असेल

11:37 (IST)12 Aug 2019
पाच लाख घरांमध्ये जिओ फायबरच्या चाचण्या सुरू

पाच लाख घरांमध्ये जिओ फायबरच्या चाचण्या सुरू आहेत. एक जीबी पर सेकंड स्पीड, फोन, सेट टॉप बॉक्स व अनेक स्मार्ट डिजिटल सोल्यूशन्स जिओ फायबरच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.

11:31 (IST)12 Aug 2019
सौदी अरॅमको आणि रिलायंस येणार एकत्र

सौदी अरॅमकोशी तेलाच्या क्षेत्रात रिलायन्सची भागीदारी झाल्याची माहिती अंबानी यांनी यावेळी दिली. सौदी अरॅमको कंपनी रिलायन्समध्ये २० टक्के गुंतवणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. साऊदी अरॅमको रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

11:27 (IST)12 Aug 2019
ऑयल टू केमिकल व्यावसाय

इंजनाचा दर्जा सुधरण्यासाठी आणि त्याची लाइफ वाढवण्यासाठी कंपनी 'ऑयल टू केमिकल' व्यावसायाच्या माध्यमातून ऑयलपासून सर्वोत्कृष्ट प्रॉडक्ट तयार करत आहे. कंपनी या व्यावसायापासून २.२ लाख करोड रूपयांची निर्यात करत आहे.

11:21 (IST)12 Aug 2019
३४० मिलियनपेक्षा आधिक युझर्स - मुकेश अंबानी

रिलायंस जियोचे मालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, ३४० मिलियनपेक्षा आधिक युझर्स आहे. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी कंपनी आपली आहे.  

11:19 (IST)12 Aug 2019
अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ तात्पुरती - मुकेश अंबानी

भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम सुरू आहे. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ तात्पुरती असल्याचे अंबानी यांनी यावेळी सांगितले

11:15 (IST)12 Aug 2019
सर्वाधिक जीएसटी आणि आयकर भरणारा उद्योग समुह - मुकेश अंबानी

रिलायंस गेल्यावर्षी भारतामध्ये सर्वाधिक जीएसटी आणि आयकर भरणारा उद्योग समुह ठरल्याचे मुकेश अंबानी यांनी मुंबईतील वार्षिक सभेत सांगितले. 

11:14 (IST)12 Aug 2019
जिओनं वर्षभरात मोठी भरारी घेतली - मुकेश अंबानी

जिओनं गेल्या वर्षभरात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थासाठी जिओचं मोठं योगदान आहे. जिओने ३२ टक्के व्यवसायावर आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे.

11:10 (IST)12 Aug 2019
४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात

रिलायंसच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली आहे. मुकेश अंबानींनी शेअर होल्डरला संबोधित करण्यास केली सुरूवात. कंपनीच्या प्रवासाबद्दल माहिती देत आहेत मुकेश अंबानी

10:51 (IST)12 Aug 2019
असे पाहा Live

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची वार्षिक सभा सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे लाइव्ह स्ट्रीमिंग द फ्लेम ऑफ ट्रूथ या युट्युब चॅनलवर होणार आहे. त्याशिवाय रिलायंसच्या अधिकृत फेसबुक पेजवरही ही माहिती मिळेल. Flame of Truth  आणि जिओच्या अधिकृत ट्विटटर हँडलवर सभेचे अपडेट देण्यात येतील.  

10:14 (IST)12 Aug 2019
गिगाफायबर सेवा –

Reliance Jio GigaFiber या बहुप्रतिक्षित ब्रॉडबँड सेवेबाबत प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. कंपनीकडून गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु आहे. काही मोजक्या ग्राहकांना या सेवेची जोडणीही देण्यात आलेली आहे. उद्याच्या सभेत या सेवेची अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. या सेवेसाठीचे प्रतिमाह ५०० ते ६०० रुपयांपासून प्लॅन असण्याची शक्यता आहे. यामध्ये प्लॅनमध्ये 50 mbps हायस्पीडसह 100 GB पर्यंत डेटा मिळेल. तसंच जिओ इंटरनेट टीव्ही, लँडलाईन सेवा, व्हिडीओ कॉलिंग यांसारख्या अनेक व्हॅल्यू अॅडेड सेवा देखील मिळतील, अशी चर्चा आहे.

10:11 (IST)12 Aug 2019
जिओ गिगा टीव्हीबाबत होणार घोषणा?

रिलायंस जिओकडून आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ गिगा टीव्हीबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गिगा फायबर सेवेद्वारेच टीव्ही चॅनलची सेवा पुरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये जिओकडून पारंपारिक डीटीएच पद्धतीऐवजी आयपीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर केला जाण्याचा अंदाज आहे.

10:08 (IST)12 Aug 2019
जिओ फोन ३ मध्ये काय असणार

कंपनी नवा फीचर फोन JioPhone 3 लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा 4G फीचर फोन असण्याची शक्यता असून उद्या हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. नव्या फीचर फोनसाठी जिओने मीडिया टेक (MediaTek)शी भागीदारी केल्याची माहिती आहे. या फोनमध्ये KaiOS ऑपरेटिंग सिस्टिम असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

10:03 (IST)12 Aug 2019
सकाळी ११ वाजाता मुकेश अंबानी करणार तीन मोठ्या घोषणा?

सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून यामध्ये मुकेश अंबानी तीन मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.  यामध्ये बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवा, जिओफोन ३ आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत घोषणा केली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

First Published on August 12, 2019 10:00 am

Web Title: reliance agm 2019 live updatesreliance agm 2019 live updates starts at 11 00 am jio gigafiber and jiophone 3 expected nck 90
Next Stories
1 ग्लायफॉसेट कर्करोगजन्य नसल्याचा दावा
2 रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
3 भांगेच्या औषधी वापरासाठी मान्यतेची प्रतीक्षा
Just Now!
X