News Flash

200 पेक्षा कमी किंमतीत Reliance Jio चा ‘बेस्ट सेलर प्लॅन’, जाणून घ्या सविस्तर

28 दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज 1.5 GB हाय-स्पीड आणि सर्व नेटवर्कवर फ्री व्हॉइस कॉलिंग

आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच आपली वेबसाइट अपडेट केली, यासोबतच कंपनीने आपल्या प्रिपेड प्लॅन्सची विविध श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. कंपनीने सुपर व्हॅल्यू, बेस्ट सेलर्स आणि ट्रेंडिंग अशा तीन श्रेणींमध्ये प्लॅन्सची विभागणी केली आहे. सुपर व्हॅल्यु कॅटेगरीमध्ये तीन, बेस्ट सेलरमध्ये दोन आणि ट्रेंडिगमध्ये एका रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. आज आपण जिओच्या 199 रुपयांच्या बेस्ट सेलर प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत…

199 रुपयांचा जिओ बेस्ट सेलर प्लॅन :-
जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून यात दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजे एकूण 42 जीबी डेटाचा फायदा युजर्सना मिळेल. रोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर 64Kbps या कमी स्पीडने डेटा वापरता येतो. शिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर देशभरात फ्री व्हॉइस कॉलिंगची (लोकल आणि एसटीडी) सेवाही मिळेल. तसेच, दररोज 100 एसएमएस आणि जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओ न्यूज, जिओसिक्युरिटी आणि जिओ क्लाउड यांसारख्या सेवाही मोफत वापरता येतील.

जिओचे अन्य बेस्ट सेलर प्लॅन :-
दरम्यान, जिओच्या बेस्ट सेलर प्लॅन्सच्या यादीत 199 रुपयांच्या प्लॅनशिवाय, 555 रुपये, 599 रुपये आणि 2 हजार 399 रुपयांचे अन्य प्लॅन्सही आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 10:50 am

Web Title: reliance jio 199 rupees bestseller plan offers unlimited plan and data with free offers sas 89
टॅग : Reliance Jio
Next Stories
1 आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही येणार Instagram! फेसबुकची घोषणा!
2 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला Micromax In 1, मिळेल 48MP कॅमेरा + 5000mAh बॅटरी
3 फक्त 6750 रुपयांत खरेदी करा Realme चा ट्रिपल कॅमेरा+6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X