News Flash

छोट्या व्यावसायिकांसाठी जिओने आणली JioBusiness ऑफर, कमी किंमतीत परवडणारे प्लॅन्स; जाणून घ्या सविस्तर

इतरांपेक्षा 10 टक्के स्वस्त दराने ब्रॉडबँड कनेक्शन देण्याचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

आतापर्यंत 2जी, 3जी किंवा 4जी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स आणल्यानंतर आता टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने देशातील सुक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने सुक्ष्म, लघु आणि मध्यम (MSMBs) उद्योजकांसाठी JioBusiness अंतर्गत काही नवीन ब्रॉडबँड प्लॅन आणलेत.

देशातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी लाँच केलेले नवीन प्लॅन्स Enterprise-Grade Fiber Connectivity सह येतील, शिवाय या प्लॅन्समध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय JioBusiness अंतर्गत डिजिटल सॉल्युशन देईल, त्याद्वारे मालकाला आपला व्यवसाय वाढवण्यास व हाताळण्यास मदत मिळेल. एमएसएमबी ग्राहकांना स्वस्त दरात म्हणजे मार्केट व्हॅल्यूच्या केवळ 10 टक्के दराने ब्रॉडबँड कनेक्शन दिलं जाईल, असा कंपनीचा दावा आहे.

ब्रॉडबँड आणि व्हॉइस सेवेसाठी सध्या व्यावसायिकांना दर महिन्याला 9900 रुपये द्यावे लागतात. पण जिओकडून केवळ 901 रुपये आकारले जातील. यामध्ये 100 एमबीपीएस स्पीडची कनेक्टिव्हिटी (अपलोड आणि डाउनलोड इंटरनेट स्पीड ) मिळेल. यामुळे जवळपास 5 कोटी व्यावसायिकांना फायदा MSMBs होईल, असा दावाही जिओकडून करण्यात आला आहे.

कसं घ्यायचं कनेक्शन? :
तुम्हालाही JioBusienss कनेक्शन घ्यायचं असल्यास प्रथम कंपनीच्या www.jio.com/business या संकेतस्थळावर जा. तिथे Interested सेक्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.

फायदा काय? :
अन्य ऑपरेटर्स 9900 रुपयांमध्ये केवळ दरमहा कनेक्टिव्हिटी उपलब्ध करुन देतात. या तुलनेत जिओने 5001 रुपयांचाही एक दुसरा मासिक प्लॅन आणला आहे. यामध्ये केवळ कनेक्टिव्हिटी नव्हे (अनलिमिटेड फायबर ब्रॉडबँड आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग) तर डिजिटल सॉल्युशन्सही मिळतील. डिजिटल सॉल्युशन्सअंतर्गत माइक्रोसॉफ्ट 365 चे 10 लायसन्स, जिओ अटेंडन्सचे 20 लायसन्स, मार्केटिंगचे प्रो लायसन्स, कॉन्फरन्सिंगचे 2/10 लायसन्स मिळतील. माइक्रोसॉफ्ट 365 अंतर्गत व्यावसायिकांना ऑफिस अॅप्स, आउटलुक ई-मेल, वन ड्राइव्ह आणि टीम्सची सेवा मिळेल. जिओ अटेंडन्सअंतर्गत ऑफिसपासून दूर असतानाही आपल्या कर्मचाऱ्यांना मॅनेज करता येते. याशिवाय मार्केटिंगअंतर्गत तुमचा बिजनेस ऑनलाइन करता येईल, तर कॉन्फरन्सिंगअंतर्गत 24 तासांपर्यंत जिओमीटद्वारे सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि माइक्रोसॉफ्ट टीम्सद्वारे ग्रुप चॅटिंग व कॉन्फरन्स करता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 2:29 pm

Web Title: reliance jio introduces jiobusiness new fiber broadband plans for small medium businesses sas 89
Next Stories
1 तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पाच दिवस बंद राहणार बँका
2 तब्बल 6000mAh बॅटरी + 48MP क्वॉड रिअर कॅमेरा, ‘मोटोरोला’चा स्वस्त फोन लाँच झाला
3 Vi ने आणले चार जबरदस्त प्लॅन्स, दररोज 3GB डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री Movies
Just Now!
X