रिलायन्स जिओने आपल्या चाहत्यांसाठी लाइव्ह मोबाइल गेम जिओ क्रिकेट प्ले अलाँगची घोषणा केली आहे. या माध्यमातून भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर जिओ सात एप्रिलपासून आपल्या माय जिओ अॅपवर ‘धन धना धन लाइव्ह’ कार्यक्रमाची सुरूवातही करणार आहे. हा कार्यक्रम माय जिओ अॅपवर एक्सक्लुजिवली दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिओ आणि बिगर जिओ ग्राहकांसाठीही पूर्णपणे मोफत असेल. प्रसिद्ध विनोदी कलाकार सुनील ग्रोव्हर आणि क्रीडा सूत्रसंचालक समीर कोच या कार्यक्रमाचे संचलन करतील. जिओ क्रिकेट प्ले अलाँग देशातील सर्व स्मार्टफोन युजर्स खेळू शकतील. हा खेळ ११ भारतीय भाषेत खेळला जाऊ शकेल. जिओ एक क्रिकेट सीझन पॅक सादर करत आहे. यामध्ये ग्राहक आपल्या मोबाइलवर लाइव्ह सामना पाहू शकेल. या ५१ दिवसांच्या पॅकमध्ये सर्वच सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीम करता येऊ शकेल. या पॅकमध्ये २५१ रूपयांत १०२ जीबी डेटा दिला जाईल.

यापूर्वी जिओने आणखी एक ऑफर सादर केली होती. जिओने सर्व प्राइम सभासद ज्यांनी ३१ मार्च २०१८ पर्यंत एक्स्क्लुजिव्ह प्राइम मेंबरशिप घेतली होती. त्यांना अतिरिक्त शूल्क न घेता एक वर्षांपर्यंत याचा लाभ मिळेल. सध्या १७.५ कोटी जिओ प्राइम सभासद आहेत. नवीन जिओ युजर्ससाठी (एप्रिल नंतरचे) जिओ प्राइम सभासदत्वासाठी ९९ रूपये वार्षिक शूल्क असेल.