रिलायन्स जिओच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक बैठकीत जिओने अपकमिंग हायब्रिड सेट-टॉप-बॉक्सबाबत (STB) माहिती दिली होती. तसेच याद्वारे लाइव्ह टिव्ही, OTT कंटेंट आणि जियो गिगाफायबर ब्रॉडबँड कनेक्शनसारखी सेवा देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु याचा प्रिव्ह्यू दाखवण्यात आला नव्हता. परंतु आता पहिल्यांदा जिओच्या हायब्रिड STB ची इमेज शेअर करण्यात आला आहे.

DreamDTH ने रिलायन्स जिओच्या हायब्रिड STB चा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये हा सेट टॉप बॉक्स निळ्या रंगात असल्याचे दिसत आहे. यामध्ये राऊटरसारखे कनेक्टिव्हिटी पोर्ट्सदेखील दिसत आहेत. Jio box मध्ये MSO कोअॅक्सिअल केबलसाठी एक एन्ट्री पोर्ट, HDMI पोर्ट, एक इथरनेट RJ45 पोर्ट, एक USB 2.0 आणि एक USB 3.0 पोर्ट देण्यात आला आहे.


सध्या याच्या सॉफ्टवेअर इंटरफेसची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु यामध्ये कस्टम UI सोबतच अँड्रॉईड ओएस देण्यात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिलायन्स जिओ फायबर सेवा सर्वांसाठी 5 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. जिओ फायबरची बिटा टेस्टींग गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तसेच वर्षभाराच्या कालावधीत कंपनीला 1 हजार 600 शहरांमधून 15 दशलक्ष लोकांपेक्षाही अधिक लोकांनी रजिस्टर केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. जिओ गिगाफायबरच्या कमर्शिअल लॉन्चनंतर त्यांचे प्लान 700 रूपयांपासून सुरू होणार ते 10 हजारांपर्यंत असतील.