21 January 2021

News Flash

4G डाउनलोड स्पीडमध्ये Reliance Jio चा दबदबा कायम, पण एअरटेलला झटका

4G डाउनलोड स्पीडमध्ये Jio ने पुन्हा मारली बाजी, पण एअरटेलला झटका...

आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने 4G डाउनलोड स्पीडमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. तर, अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) अव्वल ठरली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) डिसेंबर महिन्यातील आकडेवारी आपल्या MySpeed पोर्टलवर जारी केली आहे.

ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जिओचा डिसेंबर महिन्यातील सरासरी डाउनलोड स्पीड 20.2 Mbps नोंदवण्यात आला. नोव्हेंबरमध्ये जिओचा डाउनलोड स्पीड 20.2 Mbps होता. दुसरीकडे, एअरटेलला मात्र झटका बसलाय. त्यांचा डाउनलोड स्पीड नोव्हेंबर महिन्यापेक्षाही कमी नोंदवण्यात आला असून क्रमवारीमध्ये एअरटेल व्होडाफोन आणि आयडियाच्याही खाली गेली आहे. व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलर या दोन्ही कंपन्या व्होडाफोन-आयडिया म्हणून एकत्र आल्या असल्या तरी ट्राय मात्र दोन्ही कंपन्यांचे आकडे वेगवेगळे दाखवते. त्यानुसार डाउनलोड स्पीडमध्ये जिओनंतर दुसऱ्या क्रमांकावर 9.8 Mbps डाउनलोड स्पीडसह व्होडाफोन आहे. तर 8.9 Mbps डाउनलोड स्पीडसह तिसऱ्या क्रमांकावर आयडिया आहे.

याशिवाय गेल्या डिसेंबरमध्ये एअरटेलचा डाउनलोड स्पीड केवळ 7.8 Mbps इतका नोंदवण्यात आला. नोव्हेंबरमध्ये एअरटेलचा डाउनलोड स्पीड 8.0 Mbps होता. म्हणजेच नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये एअरटेलचा डाउनलोड स्पीड कमी झालाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 11:38 am

Web Title: reliance jio recorded highest download speed in december 2020 says trai check details sas 89
Next Stories
1 899 रुपयांत विमान प्रवास, SpiceJet ची भन्नाट ऑफर; मिळेल 1000 रुपयांचं व्हाउचरही
2 कारची प्रतीक्षा दोन ते आठ महिन्यांपर्यंत
3 251 रुपयांत मोबाईलची स्कीम आणणाऱ्याला आता ‘ड्राय फ्रूट’ घोटाळ्यात अटक, 200 कोटी रुपयांची फसवणूक
Just Now!
X