सुकामेवा म्हटलं की हिरवट- पिवळ्या रंगाच्या पिस्ताचा आवर्जून सहभाग असतो. पिस्ते मुळचे इराण अफगाणिस्तानचे. फ्रान्स, तुर्कस्तानमध्येही पिस्ते मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे इराणी तुर्की आणि फ्रेंच मिठाईत पिस्त्याचा भरपूर वापर होतो. पिस्त्याचे अनेक प्रकार आहेत. आपल्या इथे खारवलेले पिस्ते सर्रास मिळतात. आपणही याच पिस्त्यांचा वापर करतो. परंतु, खारवलेले पिस्ते जास्त प्रमाणात खाणं आरोग्यास हानिकारक आहे.

याशिवाय, पिस्ते खारवण्यासाठी अतिप्रमाणात मिठाचा वापर केल्यास त्यामधील पौष्टिक व औषधी घटक नष्ट होतात. त्यामुळे साधे पिस्ते खाणेच आरोग्यासाठी अधिक चांगले असते. ते आरोग्यासाठी शक्तिदायक, आरोग्यपूर्ण, सकस असतात.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
summer
सुसह्य उन्हाळा!
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

पिस्त्यामध्ये असणारे गुणधर्म
– पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थ, जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात म्हणूच पिस्ते आवर्जून खावे.
– दूधामध्ये पिस्त्याची पूड टाकून प्यायल्यास मेंदूचे कार्य उत्तम प्रकारे चालते असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
– स्मृतिभ्रंशाची समस्या असलेल्या लोकांनी नियमितपणे ४ ते ५ पिस्ते दुधात टाकून खावेत.
– ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे त्यांनी पिस्ते खावे कारण पिस्त्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं.