27 January 2021

News Flash

Samsung Galaxy A21s चा नवीन मॉडल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

रेड मी नोट ९ च्या स्मार्टफोन्सला टक्कर

सॅमसंग कंपनीने आपल्या Galaxy A21s या स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारा नवीन व्हेरिएंटचा फोन्स लाँच केला आहे. कंपनीन याआधी कंपनीने 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडल लाँच केले होते. नवीन व्हेरिएंटमध्ये फक्त रॅम आणि स्टोरेज वाढवण्यात आला आहे. इतर सर्व फिचर्स सारखेच आहे. महत्वाच्या फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास फोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा म्हणजेच चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. सॅमसंग गॅलेक्सी A21s मध्ये infinity-O डिस्प्ले असून याद्वारे युजर्सना दर्जेदार व्हिजुअल्सचा अनुभव मिळतो. तसेच या फोनमध्ये ५००० एमएचची दमदार बॅटरीही देण्यात आली आहे.

किंमत :-
Samsung Galaxy A21s हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट, सिल्वर आणि ब्लू अशा चार रंगांच्या पर्यायांमध्ये आला आहे. 17,499 रुपये इतकी या फोनची बेसिक किंमत कंपनीने ठेवली आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन १० ऑक्टोबरपासून सर्व रिटेल स्टोअर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, samsung.com आणि प्रमुख ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असेल.

5,000 mAh ची दमदार बॅटरी :-
या फोनमध्ये 6.5 इंचाचा infinity-O डिस्प्ले असून 5,000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. ही बॅटरी 21 तासांचा व्हिडिओ प्ले-बॅक सपोर्ट देते असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय या फोनमध्ये Exynos 850 चिपसेट असून AI पॉवर्ड गेम बूस्टर 2.0 दिले आहे. यामुळे गेम खेळताना फ्रेम रेट आणि स्टेबिलिटी सुधारण्यास मदत होते, तसेच बॅटरीचाही कमी वापर केला जातो. फोनमध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज असून 512GB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.

मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप :-
अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन कार्यरत असून फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर्सही फोनमध्ये आहेत. मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2-2 मेगापिक्सलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 1:46 pm

Web Title: samsung galaxy a21s 6gb 128gb model launched in india price specifications nck 90
Next Stories
1 गुळाचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही कराल आहारात समावेश
2 मैद्याचे पदार्थ खाताय? मग होणारे ‘हे’ दुष्परिणाम नक्की वाचा
3 भारताची पहिली ‘ऑटोनॉमस’ प्रीमियम SUV लाँच; एक लाख रुपयांत करु शकता बुकिंग
Just Now!
X