Samsung ने नुकत्याच लाँच केलेल्या मिड-रेंज स्मार्टफोन Galaxy F62 साठी पहिलं सॉफ्टवेअर अपडेट रोलआउट केलं आहे. नवीन फर्मवेअर अपडेटची साइज 180MB आहे. नव्या अपडेटमध्ये कॅमेरा स्टेबिलिटी आणि पर्फॉर्मन्स सुधारण्यासोबतच ‘बग’ फिक्स करण्यात आले आहेत. सिस्टिम पर्फॉर्मन्सदेखील सुधारण्यात आला आहे. शिवाय नवीन अपडेटमध्ये फेब्रुवारी 2021 चा अँड्रॉइड सिक्युरिटी पॅच दिला आहे. फोनच्या सेटिंग्समध्ये असलेल्या सॉफ्टवेअर अपडेट सेक्शनमध्ये जाऊन युजर्स नवीन अपडेट चेक करु शकतात.

तब्बल 7,000mAh बॅटरी क्षमता असलेला Samsung Galaxy F62 हा सॅमसंगचा नवीन मिडरेंज स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy F62 मध्ये पंचहोल डिस्प्ले असून  क्वॉड कॅमेरा सेटअपसह Exynos 9825 प्रोसेसर आहे. हे एक ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स :-
फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसोबत अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये ऑक्टाकोर Exynos 9825 प्रोसेसरही आहे. 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

Samsung Galaxy F62 कॅमेरा :-
फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप अर्थात मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. त्यातील 64 मेगापिक्सलचा सोनी IMX682 सेन्सर मुख्य कॅमेरा आहे, तर दुसरा 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल, तिसरा 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि चौथा 5 मेगापिक्सेलचा डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. रिअर आणि फ्रंट दोन्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.

Samsung Galaxy F62 बॅटरी :-
फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, NFC, USB टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅक मिळेल. फोनमध्ये साइड माउंटेड पॉवर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय यामध्ये 25W फास्ट चार्जिंगसोबतच रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट असलेली 7000mAh क्षमतेची बॅटरी आहे.

Samsung Galaxy F62 ची किंमत, ऑफर:-
Samsung Galaxy F62 ची बेसिक किंमत 23 हजार 999 रुपये आहे. ही किंमत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 25 हजार 999 रुपये आहे. हा फोन लेजर ब्लू, लेजर ग्रीन आणि लेजर ग्रे अशा तीन कलर्समध्ये उपलब्ध असेल.