News Flash

Samsung Galaxy M02s स्मार्टफोनचा आजपासून ‘सेल’, जाणून घ्या किंमत व ऑफर्स

सॅमसंग कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन

सॅमसंग कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M02s आजपासून (19 जानेवारी) देशभरात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच हा एंट्री लेव्हल फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केलाय. दहा हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या Samsung Galaxy M02s फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा, फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी यांसारखे शानदार फिचर्स आहेत.

Samsung Galaxy M02s कलर: सॅमसंगच्या या फोनमध्ये 4 जीबीपर्यंत रॅम व 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. Samsung Galaxy M02s हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड अशा तीन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल.

Samsung Galaxy M02s डिस्प्ले: फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ इन्फिनिटी व्ही डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक नॉच आहे. फोनमध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले असून हा फोन Android 10 वर काम करतो. फोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसरचा सपोर्ट आहे.
Samsung Galaxy M02s स्टोरेज : फोनमध्ये 3 जीबी व 4 जीबी रॅमसोबत 32 जीबी व 64 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. याशिवाय माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येणंही शक्य आहे.

Samsung Galaxy M02s कॅमेरा : सॅमसंग गॅलेक्सी M02s स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा, 2 मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे.

Samsung Galaxy M02s सेल्फी कॅमेरा : याशिवाय सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूला 5 मेगापिक्सेलचा कॅमेराही आहे. कॅमेऱ्यासाठी ISO कंट्रोल, ऑटो फ्लॅश, डिजिटल झूम, एचडीआर आणि एक्सपोजर यांसारखे फिचर्सही आहेत.

Samsung Galaxy M02s बॅटरी : पॉवरसाठी या फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy M02s कनेक्टिव्हिटी : ड्युअल सिम कार्ड सपोर्ट असलेल्या या फोनचं वजन 196 ग्राम असून कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये युएसबी टाइप-सी, वाय-फाय, 3.5 एमएम ऑडिओ जॅक आणि ब्लूटूथ 4.0 यांसारखे फिचर्स आहेत.

Samsung Galaxy M02S किंमत : सॅमसंग गॅलेक्सी एम02एस या फोनच्या 3जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,999 रुपये आहे. तर, 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. फोन Samsung.com, अॅमेझॉन इंडिया आणि मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये आजपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय अॅमेझॉनवर रिपब्लिक डे सेलमधील स्पेशल ऑफरअंतर्गत या फोनच्या खरेदीवर SBI क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंटही मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 11:19 am

Web Title: samsung galaxy m02s goes on sale in india from january 19 check price specs and offers sas 89
Next Stories
1 चुकूनही Facebook किंवा Twitter वर करु नका ‘तक्रार’, पोलिसांनी दिली ‘वॉर्निंग’
2 Signal येताच बंद झालं ‘मेड इन इंडिया अ‍ॅप Hike’, कोट्यवधी युजर्सनी केलं होतं डाउनलोड
3 अचानक युजर्स वाढल्याने ‘डाउन’ झालं Signal App, 24 तासांनंतर सेवा पूर्ववत
Just Now!
X