03 March 2021

News Flash

शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंगचे दोन बजेट स्मार्टफोन लाँच

स्वस्त आणि मस्त किंमतीत सॅमसंगचे दोन दमदार स्मार्टफोन

एकाहून एक बजेट स्मार्टफोन आणणाऱ्या शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग कंपनीने नवी गॅलेक्सी M सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमधील पहिले दोन स्मार्टफोन Galaxy M10 आणि M20 लाँच झाले आहेत. हे दोन्ही बजेट स्मार्टफोन असून गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनबाबत चर्चा होती. हे दोन्ही स्मार्टफोन अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

किंमत –
Galaxy M10 हा स्मार्टफोन 2GB + 16GB व्हेरिअंट आणि 3GB + 32GB व्हेरिअंट अशा दोन प्रकारात उतरवण्यात आला आहे. अनुक्रमे 7 हजार 990 आणि 8 हजार 990 रुपये किंमत आहे. तर, M20 हा स्मार्टफोन 3GB + 32GB व्हेरिअंट आणि 4GB + 64GB अशा दोन प्रकारात सादर करण्यात आला आहे. अनुक्रमे 10 हजार 990 रुपये आणि 12 हजार 990 रुपये इतकी याची किंमत ठेवण्यात आली आहे. या दोन स्मार्टफोन्सनंतर कंपनी गॅलेक्सी एम (Galaxy M) सीरिजचे आणखी काही म्हणजे Galaxy M30 आणि Galaxy M40 हे फोन देखील लाँच करणार असल्याचं सांगितलं जातंय.

फीचर्स –
गॅलेक्सी एम10 मध्ये 6.2 इंच एचडी+डिस्प्ले (रिझोल्युशन 720X1520 पिक्सल) आणि वॉटरड्रॉप नॉच आहे. 4एमएम ऑक्टाकोर Exynos 7870 SoC प्रोसेसर यात देण्यात आलंय, तसंच अँड्रॉइड ओरिओ 9.1 प्रणालीवर हा कार्यरत असेल. यामध्ये 3,400 एमएएच बॅटरी आणि मायक्रो युएसबी पोर्ट आहे. तर, गॅलेक्सी एम 20 या स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएएचची बॅटरी असून यामध्ये 13+5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 10:17 am

Web Title: samsung galaxy m10 and m20 launched in india know price and all features
Next Stories
1 खूशखबर..! सिमकार्डप्रमाणे सेट-अप बॉक्सही पोर्टेबल
2 हलाल इंटरनेट: चांगल्या अनुभवाची हमी देणारं इस्लामिक वेब ब्राउजर
3 मारुतीची नवी ‘बलेनो’ लाँच, किंमत 5.45 लाख रुपये
Just Now!
X