सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M21 आता स्वस्त झाला आहे. कंपनीने गेल्या वर्षी लाँच केलेल्या या दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत पंधराशे रुपयांची कपात केली आहे. तब्बल 6000 mAh क्षमतेची जंबो बॅटरीसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेला हा फोन आउट ऑफ बॉक्स अँड्रॉइड 10 वर कार्यरत आहे. यात प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 123 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससोबत 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी पुढील बाजूला 20 मेगापिक्सलचा सेन्सरही आहे. सेल्फी कॅमेऱ्यात AIबेस्ड फिचर्स असून फेस अनलॉक पर्यायही उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6 जीबी रॅमचा पर्याय आहे, शिवाय यात कंपनीने इन्फिनिटी यू डिस्प्ले दिलाय.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  Samsung Galaxy M21 specifications, features :-
फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI 2.0 वर कार्यरत असून यामध्ये 6.4 इंच का फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) इन्फिनिटी यू सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन असलेल्या या फोनमध्ये Mali-G72 MP3 GPU सोबत ऑक्टा-कोर अ‍ॅक्सीनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम21 चे इनबिल्ट स्टोरेज 128 जीबीपर्यंत असून कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, युएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोनमध्ये मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे.

किंमत Samsung Galaxy M21 price in India :-
सॅमसंग गॅलेक्सी एम21 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत आधी 13 हजार 999 रुपये होती. पण आता याची किंमत 12,499 रुपये झाली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत आधी 15 हजार 999 रुपये होती. पण आता या मॉडेलची किंमतही कमी होऊन 14 हजार 499 रुपये झाली आहे. नवीन किंमतीसह दोन्ही मॉडेल Samsung India च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध झाले आहेत.