सॅमसंगचा बहुचर्चित असा गॅलेक्सी नोट ८ Samsung Galaxy Note 8 हा फोन पुढील आठवड्यात भारतात लाँच करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार हा फोन १२ सप्टेंबरला भारतात लाँच होईल. विशेष म्हणजे याच तारखेला अमेरिकेत अॅपलाचा आयफोन ८ देखील लाँच होणार आहे. सॅमसंग पुढील आठवड्यात जरी गॅलेक्सी नोट ८ लाँच करत असला तरी त्याच्या विक्रीला मात्र या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असल्याचं ‘द इंडियन एक्स्प्रेस’नं म्हटलं आहे.

६. ३ इंचाचा इन्फिनिटी डिस्प्ले, सुपर अमोल्ड स्क्रीन, गोरिला ग्लास ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर ही या फोनची वैशिष्ट्ये असणार आहे. १२ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, ८ मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे. विशेष म्हणजे चांगल्या फोटोंसाठी ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनचे फीचर या फोनमध्ये देण्यात आले आहे. या फोनच्या मागच्या बाजूला बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. ६४ जीबी, १२८ जीबी, २५६ जीबी अशा व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे. मेटल बॉडी असलेला हा फोन मीड नाईट ब्लॅक, ऑर्किड ग्रे, डीप सी ब्लू आणि मॅपल गोल्ड अशा चार आकर्षक रंगामध्ये उपलब्ध होईल. भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत साठ ते सत्तर हजारांच्या आसपास असल्याचं म्हटलं जात आहे.