21 November 2019

News Flash

सॅमसंगची ‘एस’ सिरीज लवकरच होणार दाखल

जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स

मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. एकाहून एक आकर्षक असे मोबाईल बाजारात दाखल होत असतात. मूळ दक्षिण कोरियाची असलेल्या सॅमसंग कंपनीने मागील काही काळात मोबाईलच्या बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. दिवसागणिक बाजारात नवनवीन तंत्रज्ञानाचे मोबाईल दाखल होत असताना सॅमसंगनेही आपली ‘एस’ सिरीज बाजारात दाखल होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही उत्तम संधी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

संमसंगचा Samsung Galaxy S10 हा बहुप्रतिक्षित फोन लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. या ‘S’सिरीजअतंर्गत सॅमसंग तीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे फोन येत्या काही दिवसांत लाँच होतील असे कंपनीकडून समजले आहे. Galaxy S10, S10+ आणि S10e अशी या फोनची नावे आहेत. या फोनसह वायरलेस इयरफोन आणि गॅलेक्सी वॉच अॅक्टिवही लाँच करण्यात येणार आहे. भारतीय बाजारात Samsung Galaxy S10 पुढील महिन्यात ६ मार्चला लाँच केला जाणार असून त्याची विक्री १५ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. Galaxy S10 ची किंमत ६५ हजार रूपये, Galaxy S10 लाइट ५० हजार रूपये तर Samsung Galaxy S10+ ७५ हजार रूपये इतकी असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy S10 ची वैशिष्ट्ये

– स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर
– ३००० ते ४००० mAh बॅटरी
– ६.११ ते ६.४४ इंच डिस्प्ले
– पंचहोल कॅमेरा
– तिन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

First Published on February 11, 2019 4:54 pm

Web Title: samsung galaxy s series will launch in india soon galaxy s10 s10 s10e
Just Now!
X