सॅमसंगने काही दिवसांपूर्वी आपला पावरफुल स्मार्टफोन Galaxy S10 Lite लाँच केला होता. आता या स्मार्टफोनसाठी कंपनीने एक नवीन व्हेरिअंट आणले आहे. कंपनीने हा फोन 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजच्या नवीन व्हर्जनमध्ये आणलाय. आतापर्यंत हा फोन केवळ 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होता. नवीन Galaxy S10 Lite हा स्मार्टफोन प्रिज्म ब्लू, प्रिज्म व्हाइट आणि प्रिज्म ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

फीचर्स :- सॅमसंग Galaxy S10 Lite स्मार्टफोन एक मार्चपासून सर्व रिटेल स्टोअर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, सॅमसंग ई-शॉप आणि मुख्य ऑनलाइन पोर्टल्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच या फोनच्या खरेदीवर कंपनीकडून 5,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंटची ऑफर आहे. दर्जेदार मल्टी-टॉस्किंग अनुभव देणारा या फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. म्हणजे फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेरे असून यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असून या फोनमध्ये ‘सुपर स्टेडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजीसह आलेला हा भारतातील पहिलाच फोन असल्याचं कंपनीने म्हटलंय. या टेक्नॉलॉजीमुळे ग्राहकांना कॅमेऱ्याचा दर्जेदार अनुभव मिळतो.

south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान
Indian Railways Reacts to Viral Post
रेल्वेच्या आरक्षित कोचमध्ये फुकट्यांची मोठी गर्दी; व्हायरल पोस्टवर रेल्वेचे ‘असे’ उत्तर ऐकून प्रवाशांनी व्यक्त केला संताप
Thief snatched the chain from woman neck and ran away cctv video
चोर निकल के भागा! धावत्या ट्रेनमध्ये चोर महिलेची सोनसाखळी चोरून पसार; प्रवाशांनो “हा” VIDEO एकदा बघाच

स्टोरेज :– माइक्रोएसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज मेमरी 1TB पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फुल HD+ सुपर AMOLED Infintiy-O डिस्प्ले आहे. याशिवाय यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टा-कोर प्रोसेसर असून 25W सुपर फास्ट चार्जरसह 4,500 mAh क्षमतेची बॅटरी दिलीये. अवघ्या 30 मिनिटांच्या सुपर फास्ट चार्जिंगनंतर फोनची बॅटरी दिवसभर टिकते असा कंपनीने दावा केला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये ऑन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे.

किंमत : 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 44 हजार 999 रुपये. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39 हजार 999 रुपये आहे.