01 October 2020

News Flash

Samsung Independence Day Offer : टीव्ही व फ्रीजच्या खरेदीवर मोबाइल फ्री; जाणून घ्या ऑफर

फ्रीज, टीव्ही, स्मार्ट ओवन, वॉशिंग मशिन आणि एसी यांसारख्या अनेक प्रोडक्ट्सवर शानदार ऑफर

Samsung Galaxy Note 10 Lite: (फोटो-सॅमसंग)

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचे प्रोडक्ट्स विकत घेण्याचा विचार असेल तर चांगली संधी आहे. कंपनीने Samsung Independence Day offer ची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत फ्रीज, टीव्ही, स्मार्ट ओवन, वॉशिंग मशिन आणि एसी यांसारख्या अनेक प्रोडक्ट्सवर शानदार ऑफर मिळत आहेत.

1 ऑगस्टपासून हा सेल सुरू झाला असून 31 ऑगस्टपर्यंत ऑफरचा फायदा घेता येईल. यामध्ये ग्राहकांना 15 टक्के कॅशबॅक फाइनान्स स्कीमचा फायदा मिळेल. याशिवाय 990 रुपये ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे. युजर्सना प्रोडक्ट्स सहज खरेदी करता यावेत यासाठी कंपनीने खास My Samsung My EMI ऑफर आणली आहे. यानुसार, ईएमआयचा कमाल कालावधी 36 महिने असणार आहे. ऑफरमध्ये सॅमसंग QLED TV, 4K UHD TV, Smart TV, SpaceMax Family Hub रेफ्रिजरेटर, Sie-By-Side आणि फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजिरेटर, फ्लेक्सवॉश वॉशिंग मशिन, ऐडवॉश वॉशिंग मशिनसह अन्य अनेक प्रोडक्ट्सवर निश्चित बेनिफिट मिळतील.

QLED 8K TV वर 77,999 रुपयांचा मोबाइल फ्री
ऑफरमध्ये कंपनी आपल्या QLED 8K TV वर 77,999 रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी S20+ स्मार्टफोन फ्रीमध्ये ऑफर करत आहे. यासोबतच सेलमध्ये खरेदी केलेल्या या टीव्हीवर 10 वर्षांची नो-स्क्रीन बर्न-इन वॉरंटी आणि काही निवडक QLED TV च्या पॅनल्सवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

स्मार्ट टीव्हीवर 9 हजार रुपये कॅशबॅक
सॅमसंगचा स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांना 9 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर आहे. तसेच, 43 इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या स्क्रीन साइजच्या मॉडेल्स 990 रुपये ईएमआयच्या पर्यायासह खरेदी करता येतील.

फ्रीज खरेदी केल्यास 38 हजारांचा फोन फ्री
कंपनीचा स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदी करणाऱ्या युजर्सना 37 हजार 999 रुपयांचा गॅलेक्सी नोट 10 लाइट स्मार्टफोन कंपनीकडून मोफत दिला जात आहे. तर, 300 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या फ्रिज आणि वॉशिंग मशिनवर कंपनी 15 टक्के कॅशबॅक देत आहे. तसेच, 990 रुपये ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे. सेलमध्ये सॅमसंगच्या ओवन आणि एसीवरही आकर्षक ऑफर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 8:44 am

Web Title: samsung independence day offer on tvs and other appliances check details sas 89
टॅग Independence Day
Next Stories
1 टाचदुखीने त्रस्त आहात? मग करुन पाहा घरच्या घरी ‘हे’ सोपे उपाय
2 Flipkart Big Saving Days Sale : अनेक स्मार्टफोन्सवर मिळेल बंपर डिस्काउंट
3 किंमत 15 हजारांपेक्षा कमी, Poco M2 Pro स्मार्टफोनसाठी ‘या’ तारखेला सेल
Just Now!
X