दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने एक नवीन प्रायव्हसी फीचर लाँच केलं आहे. स्मार्टफोन बनवणारी प्रमुख कंपनी सॅमसंगने आपल्या काही निवडक हँडसेटसाठी मेक इन इंडियाअंतर्गत विकसित केलेलं AltZlife हे नवीन प्रायव्हसी फीचर आणलं आहे.

Altzlife एक सिक्युअर मोड आहे, युजर्स जास्त सिक्युरिटीसाठी रेग्यूलर मोडवरुन सिक्युअर मोडमध्ये स्विच करु शकतात, असे कंपनीने सांगितले. हे फीचर सुरू करण्यासाठी दोन वेळेस पॉवर बटण प्रेस करावं लागतं. या फीचरद्वारे फोनचं पॉवर बटण दोन वेळेस दाबल्यानंतर युजरला प्रायव्हेट मोड किंवा सामान्य मोडचा पर्याय मिळतो. यात फोटो आणि व्हिडिओही प्रायव्हेट फोल्डरमध्ये सुरक्षित ठेवता येतील.

सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, AltZlife मध्ये क्विक स्विच आणि कॉन्टेंट सजेशन्स असे दोन फीचर्स आहेत. सध्या हे फीचर कंपनीच्या गॅलेक्सी ए71 आणि ए51 (Galaxy A71 and Galaxy A51) स्मार्टफोन्समध्ये सॉफ्टवेअर अपडेटनंतर उपलब्ध होईल. यासाठी 10 ऑगस्टपासून अपडेट जारी होईल. फोनमध्ये असलेल्या महत्त्वाच्या किंवा खासगी माहितीमुळे दुसऱ्यांच्या हातात फोन न देणाऱ्या ग्राहकांची या फीचरमुळे चिंता दूर होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.