News Flash

Saregama ने लाँच केलं ‘कारवां’चं मोबाईल व्हर्जन; किंमत 3,990 रुपये

'आई-वडिलांना किंवा मित्र मैत्रिणींना, नातलगांना गिफ्ट देण्यासाठीही 'सारेगामा कारवां गो' हा एक उत्तम पर्याय'

(छायाचित्र सौजन्य, saregama.com )

गेलेले दिवस पुन्हा एकदा अनुभवण्याचा आणि जुन्या आठवणी जागवण्याचे ‘सारेगामा कारवां’चे प्रयत्न सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी कंपनीने पोर्टेबल स्पीकर लाँच केला होता, आणि भारतीयांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. त्यानंतर, आता कंपनीने त्या स्पीकरचं मोबाईल व्हर्जन अर्थात छोटं व्हर्जन लाँच केलं आहे. ‘सारेगामा कारवां गो’ असं या उपकरणाचं नाव असून केवळं 88 ग्रॅम इतकं याचं वजन आहे.

आकारमानाने लहान असल्याने ‘कारवां गो’चा वापर करणं, कुठेही अगदी आरामात घेऊन जाणं सहज शक्य आहे. 3 हजार 990 रुपये इतकी याची किंमत आहे. ‘सारेगामा कारवां’च्या अधिकृत संकेतस्थळावरुन याची खरेदी करता येईल. यात एकूण 3 हजार सदाबहार गाणी कंपनीकडूनच देण्यात आली आहेत. त्यात लता मंगेशकर, रफी आणि किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गजांची 351 गाण्यांचाही समावेश आहे.  याशिवाय तुमची आवडती गाणी ऐकण्यासाठी यामध्ये मेमरी कार्डचा सपोर्टही आहे.

ब्ल्यु-टूथ किंवा हेडफोन कनेक्ट करण्याचा पर्यायही यामध्ये आहे. याला चार्जिंगची सुविधा असून एकदा चार्ज केल्यानंतर 6 ते 7 तासांचा बॅकअप मिळतो. यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला असून एकदा चार्ज केल्यानंतर एकदा चार्ज केल्यानंतर 6 ते 7 तासांचा बॅकअप मिळतो, असा कंपनीचा दावा आहे. सारेगामा कंपनीच्या कारवां मालिकेतील स्पीकर्सना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आई-वडिलांना किंवा मित्र मैत्रिणींना, नातलगांना गिफ्ट देण्यासाठीही ‘सारेगामा कारवां गो’ हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो असं कंपनीचं म्हणणं आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 3:07 pm

Web Title: saregama carvaan go launched
Next Stories
1 पहिली इंटरनेट कार, MG Hector साठी उद्यापासून बुकिंग सुरू
2 Redmi K20 Pro चा जलवा, पहिल्याच सेलमध्ये 2 लाखांहून जास्त फोनची विक्री
3 अमेरिकेचा व्हिसा हवाय? सोशल मीडिया खात्यांची माहिती देणं बंधनकारक
Just Now!
X