हैदराबाद : कडुनिंबातील निंबोलाईड हे रासायनिक  संयुग स्तनाच्या कर्करोगावर उपयुक्त असल्याचा दावा येथील एनआयपीईआरच्या वैज्ञानिकांनी केला आहे. कडुनिंबाची पाने व फुले यातून हे संयुग मिळवण्यात आले आहे. जैवतंत्रज्ञान, आयुष, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्याकडे या संशोधनात पुढे जाऊन वैद्यकीय चाचण्या घेण्यासाठी मदतीची मागणी करण्यात आली आहे, असे वैज्ञानिक चंद्रैय्या गोडुगू यांनी सांगितले.

दी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेच्या वैज्ञानिकांना असे आढळून आले की, स्तनाच्या कर्करोगात पेशींची वाढ रोखण्यात निंबोलाइड हे संयुग उपयुक्त आहे. त्यावर आणखी वैद्यकीय चाचण्या करण्याची गरज आहे. यातून कर्करोगावर स्वस्तातील औषध तयार करणे शक्य आहे त्यासाठी काही सुधारित तंत्रज्ञान पद्धतींचा अवलंब करावा लागेल,  भारतात कडुनिंबाची झाडे बऱ्याच मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. कर्करोगात जी केमोथेरपी करावी लागते त्याला पर्याय म्हणून या औषधाचा वापर आश्वासक ठरू शकेल असे गोडुगू यांनी म्हटले आहे.कडुनिंबाच्या झाडाचे विविध भाग पारंपरिक औषधात वापरले जात असले तरी त्याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा अजून  देता आलेला नाही. रेणवीय मार्गिकांवरील प्रयोगातून स्तनाच्या कर्करोगावर निंबोलाईड हे संयुग उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे कर्करोग पेशींचा प्रसार थांबतो. कर्करोगग्रस्त नसलेल्या पेशींचे प्रमाण त्यामुळे तीन पट होते, असा दावा करण्यात आला आहे. कडुनिंब म्हणजे अझादिराचटा इंडिका या झाडाचे प्राचीन औषध पद्धतीत मोठे स्थान आहे. त्यात जीवाणूनाशक,कर्करोगविरोधी, मधुमेहविरोधी, वेदनाविरोधी गुण असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. आमच्या संशोधनात कडुनिंबातील निंबोलाईड संयुगाचा कर्करोगविरोधी गुण दाखवण्यात यश आले आहे पण वैद्यकीय चाचण्यांसाठी त्याचा वापर अजून करायचा आहे. शांडिल्य बायरा, अमित खुराणा, जगनमोहन सोमागोणी, आर. श्रीनीवास, गोडुगु एम.व्ही कुमार तल्लुरी यांचा या संशोधनात सहभाग आहे. निंबोलाईडमुळे इतर वाईट परिणाम कमी होतात, या औषधाला कर्करोग पेशींकडून विरोधाची शक्यता कमी आहे. निष्क्रिय कर्करोग पेशी व प्रतिरोधक कर्करोग मूलपेशी यांना मारण्यातही हे संयुग उपयोगी आहे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?