उन्हाळ्यातील आजारांची आपण माहिती घेत आहोत. निसर्गातील बदलाचा आपल्या प्रकृतीवर आरोग्यवार थेट परिणाम होत असतो. हिवाळा संपला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात घाम येणं, नेहमीपेक्षा जास्त ऊ न लागणं, अवसान गळून गेल्यासारखं होणं, थकल्यासारखं वाटणं, सतत तहान लागणं अशी नानाविध लक्षणं दिसतात, मात्र या उन्हाळ्यात सगळ्यात जास्त जर कशावर परिणाम होत असेल तर ती म्हणजे आपली त्वचा.

जाणून घेऊयात उन्हाळ्यात उन्हाळ्यात त्वचेच्या देखभालीसाठी काही टिप्स :

–  त्वचा उत्तम ठेवण्यासाठी जसं तुमच्या त्वचेला अनुसरून योग्य ते क्रीम लावणं महत्त्वाचं तसंच उन्हातून फिरताना शक्यतो चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळणं आणि हातात ‘स्किन्स’ घालणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

– उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त एसपीएफ (सन प्रोटक्शन फॅक्टर) पुरेसं नाही. तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी ब्रॉड स्पेक्ट्रम सन प्रोटेक्शन लोशनचा वापर करा. तसाच फक्त चेहराच नाही तर हात, दंड, मान, पाठ यांना देखील हे लोशन लावायला विसरू नका.

– तसंच, फेशियल ऑइल्स हा देखील या उन्हाळ्यात एक उत्तम पर्याय ठरू शकेल. लाइट वेट फेशियल ऑइल नैसर्गिक सीड ऑइल्सचे संमिश्रण असते उन्हाळ्यात यामुळे खडतर हिवाळी ऋतूनंतर तुमच्या त्वचेला कवर करता येते. हिवाळ्यात हे मॉयश्चरायजरप्रमाणे काम करते आणि निस्तेज त्वचेला पुनरुज्जीवन देते. त्यामुळे हे ऑल राऊंडरप्रमाणे त्वचेची देखभाल करते, या उत्पादनाला प्रत्येक मुलीच्या व्हॅनिटीमध्ये या ऋतूत नक्कीच स्थान मिळेल.

– उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबूरस टाकून महिनाभर आंघोळ करावी. त्यामुळे त्वचेचा रंग साफ होतो.

– मेकअप करणं गरजेचं असलं तरी चेहऱ्यावरील सूक्ष्म रंध्रे मेकअपमुळे बंद होणार नाहीत याची काळजी घ्या. तुमच्या त्वचेला श्वास घेऊ द्या. आणि विशेष म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी हा मेकअप स्वच्छ धुऊन टाकायला विसरू नका.

– भरपूर पाणी पीत राहा.

– मेडिटेशन आणि दीर्घ श्वसनामुळे मन शांत होतं. रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे त्वचेवर एक वेगळंच तेज येतं. दररोज ५ मिनिटे दीर्घ श्वसन केल्यामुळे त्वचा टवटवीत राहते.