आपल्या रोजच्या आहारात कमी-अधिक प्रमाणात साखरेचं प्रमाण चांगलंच असतं. काही वेळा प्रत्यक्षरित्या तर काही वेळा अप्रत्यक्षरित्या साखर आपल्या शरीरात जात असते. साखर शरीरासाठी आवश्यक घटक आहे. मात्र या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचीही तितकीच गरज आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक ठरु शकतो. त्याप्रमाणेच साखरेचंही आहे. शरिरात साखरेचं प्रमाण अधिक असेल तर अनेक आजारांना समोरं जावं लागतं. त्यामुळे आहारात साखरेचं प्रमाण नियंत्रणात असण्याची गरज आहे.

१. आहारात साखरेचं प्रमाण जास्त असेल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात असण्याची गरज आहे. शरीरात साखरेचं प्रमाण नियंत्रणात असेल तर त्वचेचा पोत सुधरतो. त्वचा मुलायम आणि तजेलदार होते. विशेषत: रात्रीच्या वेळी साखरयुक्त पदार्थ कमी खाल्ले तर चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. तसंच चेहऱ्यावरील मुरुम, डागही कमी होतात.

२. साखरेचं प्रमाण नियंत्रणात असेल तर शांत झोप लागते.

३. साखर जास्त खाल्ल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.

४. साखर खाल्ल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. त्यामुळे डोनट्स,पेस्ट्री, केक, मिठाई असे पदार्थ शक्यतो खाणं टाळा.

५. साखरेचे प्रमाण जास्त असल्यास स्मरणशक्ती कमकुवत होते.

६. साखरेमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते.

७. शरीरात साखरेचं प्रमाण जास्त असेल तर अन्नपचन होण्यास वेळ लागतो.

८.साखर खाणे बंद केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

९. साखर कमी केल्यानंतर सांधेदुखी व तत्सम वेदना (Joint Pains) कमी होण्यास मदत होईल.