07 March 2021

News Flash

टॅटू काढण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

टॅटू ही खरे तर एक ‘मिनी सर्जिकल प्रोसिजर’ आहे

सध्याच्या तरुणाईमध्ये टॅटूची प्रचंड क्रेझ आहे. अनेकांना टॅटू काढणं म्हणजे फॅशनचा एक भाग वाटतो. मात्र या टॅटूच्या माध्यमातून अनेक आठवणी कायमस्वरुपी जतन करुन ठेवता येतात. त्यामुळेच बरेचसे जण आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव, किंवा जीवनातील एखादी महत्त्वाची तारीख टॅटूच्या माध्यमातून शरीरावर गोंदवून घेतात. परंतु टॅटू काढताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर टॅटू काढताना योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

टॅटू ही खरे तर एक ‘मिनी सर्जिकल प्रोसिजर’ आहे. त्यामुळे टॅटू काढण्यापुर्वी टॅटू आर्टिस्टने प्रत्येक ग्राहकासाठी वेगळ्या सुया वापरणे, स्वच्छता राखणे, ग्लोव्हज वापरणे अशा वेगवेगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.

१. त्वचाविकार –
अनेकांची त्वचा ही सेंसिटीव्ह असते. त्यामुळे अशी त्वचा असणाऱ्यांनी टॅटू काढण्यापूर्वी आवश्यकती खबरदारी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा टॅटूसाठी वापरलेल्या सुयांचा एकाहून अधिक ग्राहकांसाठी वापर केला जातो. त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. एचआयव्ही, हिपेटायटिस ‘बी’, हिपेटायटिस ‘सी’ अशा आजारांचे संक्रमण होण्याची शक्यता असते.तसेच शरीरावर जिथे टॅटू करायचा तिथे एखादी महत्त्वाची शीर वा रक्तवाहिनी असेल तर त्याला इजा पोहचून रक्तवाहिनीतून संसर्ग होऊन त्या भागाला ‘गँगरीन’ होण्याचाही धोका असतो.

२. अॅलर्जिक रिअॅक्शन –
टॅटू काढताना विविधरंगी ‘डाय’ वापरले जातात. या रंगांमध्ये ‘फेरस ऑक्साईड’ हा घटक असतो. फेरस ऑक्साईडचे वेगवेगळ्या तापमानाला वेगळे रंग मिळतात. काळा, गडद आणि फिकट चॉकलेटी, लाल आणि ‘टायटॅनियम डायऑक्साईड’पासून मिळणारा पांढरा अशा वेगवेगळ्या रंगांची शाई असते. टॅटू काढून घेणाऱ्याची त्वचा त्यातील ‘डाय’ला संवेदनशील असू शकते आणि त्यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी येऊ शकते. त्यात खाज येणे, फोड येणे, त्यातून पाण्यासारखा स्राव येणे हे होऊ शकते. त्वचेला संसर्गही होऊ शकते.

३. एमआरआय चाचणी करताना समस्या –
बऱ्याच जणांना असं वाटतं की टॅटू काढल्यानंतर एमआरआय चाचणी करता येत नाही. परंतु असं नाहीये. टॅटू काढल्यानंतरही एमआरआय चाचणी करता येऊ शकते.मात्र चाचणी झाल्यानतंर येणाऱ्या रिपोर्टमध्ये एमआरआयची प्रतिमा थोडी खराब येण्याची शक्यता असते.

४. रक्तदान करताना अडथळा –
टॅटू काढल्यानंतर जवळपास १ आठवडा कोणालाही रक्तदान करता येत नाही. कारण टॅटू काढताना वापरलेली शाई आणि घातक केमिकल्स आपल्या रक्तावाटे अन्य व्यक्तीच्या रक्तात मिसळू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 2:25 pm

Web Title: side effects of tattoo ssj 93
Next Stories
1 शांत झोप हेच खरे डिप्रेशनवरचे औषध
2 चीनमधील नव्या विषाणूबाबत भारतात खबरदारी
3 सौंदर्यप्रसाधनांतील रसायने हानिकारक
Just Now!
X