झोप ही औषधासारखी असते असे म्हटले जाते. रात्री मिळालेली झोप आपल्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने करते. मात्र, चुकीच्या अवस्थेत बराच वेळ झोपल्यास आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्यापैकी अनेकांनी शरीराच्या एकाच भागामध्ये वेदना होत असल्याचे अनुभवले असेल. या वेदना सहसा डोके, खांदा, पोट व पाठ यांच्याशी संबंधित असतात. झोपण्याची पद्धत चुकीची असेल तर आपले शरीर त्याला विपरित प्रतिसाद देते. याचे कारण म्हणजे, बाहेरून आपले शरीर डाव्या व उजव्या बाजूला सारखेच दिसत असले तरी ते आतल्या बाजूने सारखे नसते. हृदय, पोट, मूत्राशय व आणखी काही अवयव शरीरात डाव्या बाजूला असतात. आपले हृदय, पचनक्रिया व मेंदू कसा काम करेल, हे ठरवण्यामध्ये आपल्या झोपण्याच्या दिशेची (डावी की उजवी) भूमिका महत्त्वाची असते. स्लीप @ १० या उपक्रमांतर्गत गोदरेज इंटेरिओने याबाबत विशेष अभ्यास केला आहे.

हृदयाच्या कार्यात सुधारणा :  हृदयाकडून रक्त वाहून आणणारी सर्वात मोठी धमनी ही डाव्या बाजूला असते, त्यामुळे आपण उजव्या कुशीवर झोपलो तर पृथ्वीची गुरूत्वाकर्षणशक्ती आपल्या हृदयाच्या विरुद्ध दिशेला काम करते व त्यामुळे या धमनीला रक्त वाहून नेण्यासाठी दुप्पट परिश्रम करावे लागतात. त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्यास हृदयावर फार ताण येत नाही, कारण गुरूत्वाकर्षणशक्ती रक्त वाहून नेण्याच्या क्रियेच्या विरुद्ध काम न करता या क्रियेच्या बाजूने काम करते.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

पचनक्रियेत सुधारणा :  हृदयासारखा आपल्या शरीरातील दुसरा सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे पोट. हेही शरीरात डाव्या बाजूला असते. पोटामध्ये पित्तरस असतो व त्यामुळे पचन प्रक्रियेमध्ये मदत होते. डाव्या बाजूला झोपल्याने अन्नामध्ये पित्तरस मिसळण्याची शक्यता वाढते व त्यामुळे पचन वेगाने होण्यास मदत होते, तर उजव्या कुशीवर झोपल्यास पचनाची प्रक्रिया मंदावते. अपचनाचा त्रास असलेल्या व आतड्याची हालचाल अनियमित असलेल्या व्यक्तींनी या समस्यांवर मात करण्यासाठी डाव्या कुशीवर झोपायला हवे.

मेंदूला चालना :  मेंदू मध्यवर्ती ठिकाणी असल्याने कोणत्याही कुशीवर झोपल्यावर त्याच्या कार्यात कोणताही अडथळा येत नाही. परंतु, मेंदूच्या वेस्ट क्लीअरिंग सिस्टीमवर किंवा ग्लिम्फेटिक सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो. आपल्या शरीराची डावी बाजू महत्त्वाची लिम्फेटिक बाजू असते. आपल्या मेंदूमध्ये काही टॉक्सिन तयार होतात व ते लिम्फेटिक सिस्टीमद्वारे बाहेर टाकले जातात. त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्याने पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणशक्तीच्या मदतीने ही प्रक्रिया अधिक कार्यक्षमपणे केली जाते. त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्याने मेंदू स्वच्छ होण्यास मदत होते.

निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी, डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला प्राचीन परंपरा व आधुनिक विज्ञान यांनी दिला आहे. कारण, यामुळे शारीराची कार्ये सुधारण्यासाठी मदत होते व त्यामुळे हृदय व पोट यांच्याशी संबंधित समस्या दूर राहतात. येथून पुढे, जाणीवपूर्वक डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.

डॉ. प्रिती देवनानी, स्लीप थेरपिस्ट