शीतपेय आणि साखर यांच्या अतिसेवनामुळे शरीरातील मुत्रपिंडाच्या कार्यात अडथळा निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुत्रपिंड निकामी होण्याची शक्यताही वाढते.
जपानमधील एका वैद्यकीय विद्यापीठाने केलेल्या चाचणीत, दिवसातून दोनवेळा सतत शीतपेयांच्या सेवनामुळे शरीरातील प्रथिने बाहेर जाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरिरात प्रथिनांची कमतरता भासते. मुत्रपिंडाच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो.
त्याचबरोबर अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या माहितीनुसार, शीतपेयांच्या अतिसेवनामुळे मुत्रपिंडाच्या कार्यात महत्वाची भूमिका निभावणाऱया ‘अँगीटेन्सिन २’ हे प्रथिन शरिराबाहेर जाण्याची क्रिया वाढते. हे प्रथिन शरीरातील मीठाचे प्रमाण संतुलित राखण्याचे काम करते.
त्यामुळे शीतपेयांचे सेवन जमेल तितके टाळावे असा सल्लाही या विद्यापीठाने दिला आहे.