माणसाच्या जीवनात भावनांना फार महत्त्वाचे स्थान असते म्हणतात. आता तर इमोशनल कोशंट (भावनांक) वगैरेही काढला जातो. चांगल्या भावना त्याच्या शरीरालाही सुखद अनुभूती देतात. भावनांचा परिणाम शरीरावर होत असतो. जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला शारीरिकदृष्टय़ाही अतिशय आल्हाददायक वाटते, जर तुम्ही निराशेत असाल तर चक्क छातीत वेदनाही जाणवतात, त्यामुळे भावनांवर तुमच्या शरीराचा डोलारा उभा असतो असे म्हणायला हरकत नाही, पण नैराश्येच्या बाबतीत मात्र त्या भावना जरा नियंत्रणात ठेवणेच चांगले असे यातून दिसून येते. भावनांचा शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास फिनलंडमधील आल्टो विद्यापीठात करण्यात आला असून, त्यात भावना या आपल्या शारीरिक संवेदनांना उद्दीपित करतात हेच स्पष्ट झाले आहे. वेगवेगळय़ा भावनांचा परिणाम शरीराच्या वेगवेगळय़ा भागांवर वेगवेगळा होतो. पश्चिम युरोप व पूर्व आशियायी संस्कृतीत वाढलेल्या लोकांवर मात्र भावनांना शरीराने दिलेल्या प्रतिसादाचे स्वरूप सारखेच होते.
आल्टो विद्यापीठातील प्रा. लॉरी न्यूमेनमा यांच्या मते आपल्या भावना आपली मानसिक स्थितीच ठरवतात असे नाही तर शारीरिक स्थितीवरही परिणाम करतात. भावना व त्याचा शरीरावर होणारा परिणाम यांच्या या संशोधनातून स्पष्ट झाल्याने आनंददायी घटना व धोकादायक घटना यावर कशी शारीरिक प्रतिक्रिया दिली जाते, त्यामुळे वेगवेगळय़ा भावनिक लक्षणांचे निदान करणे शक्य होणार आहे.
संशोधन काय?
फिनलंड, स्वीडन व तैवान येथील ७०० व्यक्तींवर या संशोधनात प्रयोग करण्यात आले, त्यासाठी या व्यक्तींमध्ये भावनांचा परिणाम तपासण्यासाठी संगणकावर मानवी शरीराची चित्रे दाखवून कुठल्या भावनेने शरीराच्या कुठल्या भागात क्रियाशीलता वाढते किंवा कमी होते आहे, हे ते भाग रंगवून दर्शवण्यास सांगितले. त्यात असे दिसून आले, की जास्तीत जास्त भावना शरीराच्या वरच्या भागात परिणाम करतात, त्यामुळे श्वासोच्छ्वास व हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतो. बहुतेक सर्व भावनांचा डोक्याच्या भागात चांगला-वाईट परिणाम जाणवतो, त्यामुळे चेहऱ्यावर भावही बदलतात, काही वेळा शरीराचे तापमान बदलते, डोळय़ांतून अश्रू येतात. संताप, सुख यांसारख्या भावना शरीरातील वरच्या भागातील अवयवांवर परिणाम करतात. माणूस दुखी असेल तर त्याच्या हालचाली मंदावतात. भावनांचा पचनव्यवस्थेवरही परिणाम होतो. दुखातिरेकाने घशाच्या भागात परिणाम होतो. सुखद भावना शरीराच्या सर्व भागांवर सकारात्मक परिणाम करतात, असे संशोधनात दिसून आले.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….