23 September 2020

News Flash

ऑडी, बीएमडब्‍ल्‍यूपेक्षाही Sonyच्या ‘या’ टीव्हीची किंमत जास्त, काय आहे खासियत ?

तब्बल 98 इंचाचा 8K TV लाँच

जपानची प्रसीद्ध कंपनी सोनी कॉर्पोरेशनने आपल्या नव्या टेलिव्हिजन सेट्सबाबत खुलासा केला आहे. यावेळी सोनी कंपनीने तब्बल 98 इंचाचा 8K TV लाँच केला आहे. या टीव्हीची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 70 हजार डॉलर(69 हजार 999 डॉलर) म्हणजेच जवळपास 49.13 लाख रुपये इतकी या टीव्हीची आहे. या किंमतीमध्ये तुम्ही ऑडी किंवा बीएमडब्ल्यू सारखी एखादी अलिशान कार विकत घेऊ शकतात. सोनी मास्टर सीरीज Z9G 8के एचडीआर टीव्ही असं या टीव्हीच्या मॉडेलचं नाव आहे.

या टीव्हीमध्ये Sony X1 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर एकावेऴी 33 दशलक्ष पिक्सल्स ऑप्टीमाईज करू शकतो. सोनीच्या दाव्यानुसार X1 चिप 8K रिझोल्यूशनच्या प्रत्येक ऑब्जेक्टला नीट पडताळू शकतो. सोनीची ही मास्टर सिरिज जून 2019 मध्ये बाजारात येणार आहे.

या टीव्हीमध्ये 8के एक्‍सटेंडेड डायनामिक रेंज पीआरओ आणि फुल-अॅरे लोकल डिमिंगसह बॅकलाइट मास्‍टर ड्राइव्हा यांसारखे फीचर्स असणार आहेत. सध्या बाजारात असलेल्या सॅसमंग कंपनीच्या क्‍यू900 टीव्हीला सोनीच्या या टीव्हीद्वारे तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. सॅमसंगच्या क्‍यू900 टीव्हीची किंमत जवळपास 100,000 डॉलर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:09 pm

Web Title: sony master series z9g 98 inch 8k hdr tv launched
Next Stories
1 सर्व डिझेल कारची विक्री थांबवण्याचा निर्णय, मारुती सुझुकीची मोठी घोषणा
2 शाओमीचा धमाका ! इलेक्ट्रीक स्कूटर लाँच
3 KTM Duke 790 लवकरच होणार लाँच, बजाजने जारी केला टीझर
Just Now!
X