29 March 2020

News Flash

‘पॅरालिसिस’च्या रुग्णांसाठी आलं खास App, जाणून घ्या डिटेल्स

'द इंडियन स्ट्रोक असोसिएशन'कडून पक्षाघाताच्या रुग्णांना आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करणारे अ‍ॅप लाँच...

(रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतानाचे संग्रहित छायाचित्र)

‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’ने StrokeSOS हे अ‍ॅप लॉंच केले असून पक्षाघाताच्या रुग्णांना आकस्मिक संकटकालीन स्थितीत मदत करणे हा या App चा उद्देश आहे. पक्षाघातामुळे अचानक आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास काय करावे, कुठे जावे याबाबत रुग्णांना माहिती आणि मदत एकाच अ‍ॅपवर मिळावी असा विचार करुन हे अ‍ॅप तयार करण्यात आल्याचं ‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’कडून सांगण्यात आलं.

स्ट्रोकएसओएस हे अ‍ॅप पक्षाघाताच्या रुग्णांना आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करते. रुग्ण नेमका कुठे आहे जाणून घेते, पक्षाघाताची सर्वसामान्य लक्षणे काय असतात त्याची माहिती पुरवते आणि पक्षाघातावरील उपचार पुरवले जाऊ शकतील अशी रुग्णाला सर्वात जवळची हॉस्पिटल्स (सरकारी आणि खाजगी) कोणती आहेत याची माहिती पुरवते. अ‍ॅपमध्ये हॉस्पिटलचे फोन नंबर, तसेच हॉस्पिटलचे नेमके ठिकाण आणि गूगल मॅपच्या मदतीने तिथे कसे पोचता येईल, त्यासाठी किती वेळ लागेल ही सर्व माहिती पुरवली जाते.

या अ‍ॅपमुळे पक्षाघाताचे रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक, त्यांची काळजी घेत असलेल्या व्यक्तींना पक्षाघातावरील उपचारांसाठी सर्वात जवळची लिस्टेड हॉस्पिटल्स कोणती आहेत ते शोधून काढून त्यांना मदतीसाठी विनंती करता येईल. यात पक्षाघातातून बरे होण्याच्या दृष्टीने उपाययोजना, डॉक्टरांसाठी माहिती, पक्षाघातामध्ये असलेले धोके, रुग्णांची काळजी घेत असलेल्या व्यक्तींसाठी माहिती, रुग्णांच्या स्थिती आणि गरजेनुसार व्यक्तिगत पुनर्वसन प्रक्रिया इत्यादींचा समावेश आहे.

तर, “पक्षाघात ही अतिशय गंभीर आणि आणीबाणीची स्थिती असते, यामध्ये ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरण पुन्हा पूर्ववत सुरु व्हावे यासाठी इंट्रावेनस थ्रोमबोलिसिस (साडेचार तासांपर्यंत केले जाते) किंवा मेकॅनिकल थ्रोमबेक्टॉमी (६ तासांपर्यंत आणि काही निवडक रुग्णांवर २४ तासांपर्यंत केले जाते) हे उपचार अतिशय तातडीने केले जाणे खूप गरजेचे असते. दुर्दैवाने भारतात फक्त १ ते ५% रुग्णांना या उपचारांचे लाभ मिळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे पक्षाघात झाला आहे हे ओळखू येण्याइतपत जागरूकता लोकांमध्ये नाही आणि आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास रुग्णांना कुठे घेऊन जायचे, कोणते उपचार करवून घ्यायचे याची देखील माहिती नसते”, असे अपोलो हॉस्पिटल्सच्या डिपार्टमेंट ऑफ न्यूरॉलॉजीचे सिनिअर कन्सल्टन्ट न्यूरॉलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर तसेच इंडियन स्ट्रोक असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉ.विनीत सूरी यांनी सांगितले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 2:23 pm

Web Title: strokesos app launched by indian stroke association for paralysis patients and stroke treatment to help in emergency situation sas 89
Next Stories
1 coronavirus : रियल एस्टेट क्षेत्रासाठी गुढीपाडवा नाही आणणार कोणताही हर्षनाद
2 Coronavirus लॉकडाउन : सर्व सेवा बंद करण्याची घोषणा, Flipkart चा मोठा निर्णय
3 Yamaha ची जबरदस्त Majesty S 155 स्कूटर , जाणून घ्या खासियत
Just Now!
X