साखरयुक्त गोड पेयांचे मोठ्याप्रमाणात सेवन केल्यास रजोनिवृत्त महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असल्याची ताकीद एका नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासातून देण्यातआली आहे.
ज्या महिला साखरेपासून निर्माण करण्यात आलेल्या शितपेय़ांचे अतिसेवन करतात त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा सर्वाधीक धोका असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.  
“या विषयीचा आमचा हा पहिलाच अभ्यास असला तरी, ज्या महिला साखरेपासून तयार करण्यात आलेल्या शितपेयांचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात त्यांना एस्ट्रोजनडिपेंडंट-१ प्रकारचा गर्भाशयाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असल्याचे या अभ्यासावर संशोधन करणाऱ्या मिनेसोटा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एपिडेमिओलॉजी आणि समाज आरोग्य विभागातील एक संशोधन सहकारी माकी इनॉउ-चॉइ यांनी सांगितले.
सामान्य वजन असलेल्या महिलांपेक्षा वजन वाढलेल्या महिलांमध्ये एस्ट्रोजीन आणि इन्सूलिनचे प्रमाण जास्त असते. वाढलेले एस्ट्रोजीन आणि इन्सूलिनचे प्रमाणच या कर्करोगास कारणीभूत ठरत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.