News Flash

#SunglassesDay: चेहरेपट्टीनुसार सनग्लासेस निवड कशी करावी आणि इतर टीप्स

कोणत्या आकाराचे सनग्लासेस चांगले दिसतील हे अनेकांना समजत नाही

सनग्लासेस

आज आहे सनग्लासेस डे. सनग्लासेस म्हटल्यावर अनेकजण गोंधळतात. कोणत्या आकाराचे सनग्लासेस चांगले दिसतील हे अनेकांना समजत नाही. त्यामुळेच चेहरेपट्टी वेगळी आणि घेतलेले सनग्लासेस वेगळे असं अनेकांच होतं. म्हणूनच सनग्लासेस घेताना काय काळजी घ्यावी, कोणत्या चेहऱ्यांना कोणत्या प्रकारचे सनग्लासेस चांगले दिसतात याबद्दलच्या टिप्स…

चेहरेपट्टी आणि सनग्लासेस

१. काही वेळा आपल्याला आवडला म्हणून आपण गॉगल खरेदी करतो , पण कधी कधी तो आपल्या चेहऱ्याला सूट होतोच असं नाही. त्यामुळे शक्यतो सनग्लासेस लावून बघितल्याशिवाय, ट्राय केल्याशिवाय खरेदी करू नयेत.

२. अंडाकृती चेहरेपट्टी असणाऱ्यांनी ब्रॉड, ओव्हर साइज फ्रेम्स वापराव्यात. त्यांना वाइड फ्रेम्स असलेले गॉगल सूट होतात. याउलट राउंड चेहरेपट्टी असणाऱ्यांनी स्क्वेअर शेप, चेहऱ्याला सूट होईल एवढीच राउंड किंवा सेमी राऊंड शेप ग्लासेस वापरायला हरकत नाही.

३. हल्ली बाजारात अनेक स्टाइल्स आणि कलरशेड्सचे सनग्लासेस बघायला मिळतात. आपल्या गरजेनुसार गॉगलची शेड निवडावी. उन्हाळ्यासाठी सनग्लासेसची निवड करताना शक्यतो ब्राउन, ब्लॅक, वाइन अशा डार्क शेड्स निवडाव्यात. हे रंग क्लासी दिसतात आणि कोणत्याही आउटफिटला सूट होतात.

४. ब्लॅक शेड प्रत्येकालाच सूट होते असं नाही. त्यामुळे कधी कधी ब्लाइंड लुक येऊ शकतो. त्यामुळे शेड निवडताना काळजीपूर्वक निवडावी.

५. आपली लाइफ स्टाइल, आपण वापरत असलेले आउटफिट्स या सगळ्याचा विचार करून तुमच्या आवडीनुसार साधे किंवा ब्रॅण्डेड सनग्लासेस खरेदी करू शकता. पण रस्त्यावरून गॉगल खरेदी करताना त्याची शेड, ग्लास तपासून बघितली पाहिजे. वाईट दर्जाच्या गॉगलमुळे दृष्टीला हानी पोचू शकते आणि त्याचा उन्हापासून बचाव करण्यासाठी फारसा उपयोगही होत नाही.

सनग्लासेसची काळजी कशी घ्याल…

>
तुम्ही अँटिरिफ्लेक्टिव आणि कोटेड सनग्लास वापरत असलात तर तो साफ करण्यासाठी मिळणाऱ्या स्प्रेनेच साफ करावा.

>
पेपर नॅपकिन, रुमाल, टॉवेल, कपडे यांनी ग्लास साफ केल्यास त्याला चरे पडू शकतात. त्यामुळे या काचा लेन्स क्लिनर स्प्रेने, मुलायम कपडय़ाने साफ कराव्यात.

>
काचा साफ करण्यासाठी मायक्रो फायबर किंवा मऊ सुती कपडय़ाचा वापर करवा.

>
लेन्स नियमित साफ कराव्यात. साफ न केल्यास त्यावर धूळ आणि घामाचा चिकट थर जमून धूसर दिसायला लागेल.

>
गॉगल किंवा चष्मा लावताना व काढताना फ्रेमला धरून काढावा. लेन्सला हात लागणार नाही याची काळजी घ्या.

>
लेन्सवर काही चिकट किंवा दाट डाग पडला असेल तर तो नखाने खरवडून काढण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काचेवर चरे पडतील.

>
गॉगल, चष्मा त्यासाठी मिळणाऱ्या केसमध्ये ठेवावा.

>
बॅगेत किंवा खिशात ठेवल्याने त्याच्या दांडय़ा वाकून, काचाही खराब होतील.

>
केसमध्ये ठेवताना लेन्स वरच्या बाजूला येतील अशा पद्धतीने ठेवावा. उलटा करून ठेवल्यास लेन्सवर चरे पडतील.

>
दांडय़ाचे स्क्रू पडल्यास किंवा नोजपॅड निघाल्यास त्वरित बसवून घ्यावे. कारण त्यामुळे बॅलन्स बदलतो व त्यामुळे पाहण्यास त्रास होतो.

>
गॉगल किंवा चष्मा काढताना कधीही एका हाताने काढू नये. एका हाताने काढताना हिसका बसल्याने अलाइन्मेंट बिघडून फ्रेम चेहऱ्यावर व्यवस्थित बसत नाही.

>
लेन्स साफ करण्यासाठी अमोनिया किंवा अल्कोहालिक ग्लास क्लिनरचा वापरू नये त्यामुळे लेन्सचे कोटिंग निघून जाते. लेन्स क्लिनर नसल्यास साध्या पाण्यात भांडय़ाचा साबण थोडासा विरघळवून हलक्या हाताने काचा साफ कराव्या व मायक्रोफायबर कपडय़ाने कोरडय़ा कराव्या.

>
आरामदायी किंवा स्टाइल म्हणून बरेच जण चष्मा किंवा गॉगल डोक्यावर लावतात. त्यामुळे ईअरपीस ताणले जाऊन सैल होतात. शिवाय लेन्सला केसाचे तेल लागून लेन्स खराब होतात.

>
उन्हाळ्यात चष्मा किंवा गॉगल कारमध्ये ठेवू नका, जास्त उष्णतेने लेन्सचे कोटिंग उडून जाते आणि फ्रेमची ठेवण बिघडते.

सनग्लासेस/ ग्लेअर्सचे प्रकार

एव्हीअेटर –
एव्हीअेटर हा ग्लेअर्सचा प्रकार असून मुख्यत्वे ‘रे बॅन’ कंपनीचे एव्हीअेटर ग्लेअर्स सर्व वयोगटांमध्ये भाव खाऊन जातात. एव्हीअेटर ग्लेअर्समुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून (१००% यू.व्ही प्रोटेक्शन) डोळ्यांचे संरक्षण होते. बर्फआच्छादित प्रदेशात, प्रवासादरम्यान एव्हीअेटर ग्लेअर्स उपयोगी पडतात. रे बॅन कंपनीच्या एव्हीअेटर ग्लेअर्सबरोबरच फास्ट ट्रॅक कंपनीच्या एव्हीअेटर ग्लेअर्सचीही सध्या चलती आहे. ६९५ रुपयांपासून ते २४९५ रुपयांपर्यंत विविध किमती आणि प्रकारांमध्ये हे ग्लेअर्स उपलब्ध आहेत. हे ग्लेअर्स पुरुष आणि महिला दोघेही परिधान करू शकतात. निळा, हिरवा, काळा या रंगांना ग्राहकांची विशेष पसंती मिळते. एव्हीअेटर ग्लेअर्स प्लास्टिक फ्रेम, मेटल फ्रेम, दोघांचे मिश्रण (प्लास्टिक+मेटल) अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे एव्हीअेटर ग्लेअर्सचे त्याच्या आकारानुसार काही उपप्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे-

क्लासिक एव्हीएटर – 
क्लासिक एव्हीएटर प्रकारचे ग्लेअर्स दिसायला साधे असून त्याची फ्रेम पूर्णपणे मेटल आवरणातून तयार झालेली असते.

मॉडिफाय एव्हीएटर –
मॉडिफाय एव्हीएटर क्लासिक एव्हीएटरचे विकसित रूप असून यामध्ये ग्लेअर्सच्या वरच्या बाजूस वक्र (कव्‍‌र्ह) असतो.

स्क्वेअर (चौरसाकृती) एव्हीएटर – 
या प्रकारात ग्लेअर्सची फ्रेम आणि साहजिकच काच चौकोनी आकारात असते.

वेफेरर – 
एव्हीएटरबरोबरच वेफेरर या ग्लेअर्सच्या प्रकारालाही ग्राहकांची पसंती मिळताना दिसते. सिम्पल वेफेरर आणि मक्र्युरी फिनीश वेफेरर असे वेफेरर ग्लेअर्सचे दोन प्रकार पडतात. सिम्पल वेफेरर नावाप्रमाणेच साधे आहेत. वेफेरर ग्लेअर्स पुरुष आणि महिला दोघेही परिधान करू शकतात.

स्पोर्टी –
‘स्पोर्टी’ या ग्लेअर्स प्रकाराच्या नावावरूनच आपल्याला त्याचा उपयोग लक्षात येऊ शकतो. स्पोर्टी ग्लेअर्स हे साहसी खेळ, गिर्यारोहण, बायकिंग अशा विविध गोष्टींसाठी उपयोगी पडतात. स्पोर्टी या ग्लेअर्स प्रकारात डोळ्यांचा सर्वाधिक भाग झाकला जात असल्याने एव्हीअेटर, वेफेरर या ग्लेअर्स प्रकारांपेक्षा स्पोर्टी ग्लेअर्समध्ये डोळ्यांचे संरक्षण अधिक होते. साहसी खेळ, गिर्यारोहण, बायकिंग यामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असतो. अशा वेळी स्पोर्टी ग्लेअर्स आपल्या डोळ्यांचे योग्य त्या प्रकारे संरक्षण करतात.

नाइट व्हीजन (ट्रान्सपरंट ग्लेअर्स) – 
रात्रीच्या वेळेस बायकिंग करण्याची मजाच काही और असते. वाऱ्यावर झेल घेत जोरात गाडी चालविण्याचा शौक अनेक दुचाकीस्वारांना असतो. परंतु या सगळ्यात डोळ्यांची काळजी घेणे हे अतिशय गरजेचे असते. या हेतूतून नाइट व्हीजन ग्लेअर्स उदयाला आले. नाईट व्हीजन ग्लेअर्समध्ये पारदर्शक काच असते. त्यामुळे गाडी चालविताना डोळ्यांचे संरक्षणही होते आणि समोरचे दिसण्यासही सोपे जाते. नाइट व्हीजन ग्लेअर्स पुरुष आणि महिला दोघेही परिधान करू शकतात.

कॅट आय – 
अंडाकृती आकाराचे फॅशनेबल ग्लेअर्स बाजारात पाहायला मिळतात. खास मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या या ग्लेअर्सना ‘कॅट आय ग्लेअर्स’ असे म्हटले जाते. काही तरी हटके परंतु आकर्षक असे हे कॅट आय ग्लेअर्स आजकाल बऱ्याच तरुणींनी परिधान केल्याचे पाहायला मिळते. जम्पसुट, पलाजो हे कपडय़ांचे प्रकार आणि कॅट आय ग्लेअर्स हे समीकरण आज मुलींमध्ये प्रचलित आहे.

मक्र्युरी/मिरर फिनीश ग्लेअर्सला सर्वाधिक मागणी

मक्र्युरी/मिरर फिनीश ग्लेअर्स, ग्लेअर्सच्या सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. नुकतेच दिवाळीच्या मुहुर्तावर फास्ट ट्रॅकने ‘अफ्टर पार्टी सनग्लासेस’ हे कलेक्शन बाजारात आणले. यामध्ये मक्र्युरी/ मिरर फिनीश ग्लेअर्स आहेत. या ग्लेअर्सचा वापर समुद्रकिनाऱ्यावरील पार्टीसाठी करण्यात येतो. गडद रंगांमधील मक्र्युरी/मिरर फिनीश ग्लेअर्समध्ये आपल्याला आपल्या चेहऱ्याचे प्रतििबब अगदी ठळकपणे दिसते. म्हणूनच बहुधा याला मिरर फिनीश ग्लेअर्स असे नाव पडले असावे. सनग्लासेस/ ग्लेअर्समध्ये ग्राहकांची सर्वाधिक पसंती ‘रे बॅन’ कंपनीला मिळताना दिसत आहे. त्यापाठोपाठ कॅल्विन क्लेईन, टॉमी हिलफिगर, ली कुपर अशा ब्रॅण्डना पसंती मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 2:09 pm

Web Title: sunglasses day what you need to know before buying sunglasses scsg 91
Next Stories
1 ‘या’ मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद
2 पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश
3 कशी आहे Renault ची नवीन Triber? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Just Now!
X