Suzuki ने भारतीय बाजारात Access 125 ही स्कुटी बीएस-6 मानकांसह लाँच केली आहे.  BS6 Suzuki Access 125 विविध पाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलीये. ही स्कुटी म्हणजे सुझुकी मोटरसाइकल्स इंडियाचे पहिले बीएस6 मॉडेल आहे. देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या 125 सीसीच्या स्कुटरमध्ये अ‍ॅक्सेस अत्यंत लोकप्रिय आहे.

कंपनीने नव्या अ‍ॅक्सेस 125 मध्ये काही नवे फीचर्स दिलेत. यामध्ये एक्सटर्नल फ्युअल फिलिंग, एलईडी हेडलाइट आणि स्पीडोमीटरवर  ईको लाइटचा समावेश आहे. स्कुटीमधील डिजिटल स्क्रीनवर आता व्होल्टेज मीटर डिस्प्लेही असेल, त्याद्वारे बॅटरी लाइफबाबत माहिती मिळेल. सुझुकी अ‍ॅक्सेस 125 स्टँडर्ड व्हेरिअंट पांच रंगांच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. यामध्ये पर्ल सुझुकी डीप ब्लू, पर्ल मिराज व्हाइट, ग्लास स्पार्कल ब्लॅक, मेटॅलिक मॅट प्लॅटिनम सिल्वर आणि मेटॅलिक मॅट फायब्रोइन ग्रे या रंगाचा समावेश आहे. तर, स्पेशल एडिशनमध्ये चार कलर्सचे पर्याय आहेत. यामध्ये मेटॅलिक डार्क ग्रीनिश ब्लू, मेटॅलिक मॅट ब्लॅक, मेटॅलिक मॅट बोर्डो रेड आणि पर्ल मिराज व्हाइट या रंगाचा पर्याय आहे. अ‍ॅक्सेस 125 स्कुटीमध्ये बीएस6 इंजिन असून हे इंजिन 750rpm वर 8.7hp ची ऊर्जा आणि 5,500rpm वर 10Nm टॉर्क निर्माण करतं.  बीएस6 इंजिनमध्ये कार्ब्युरेटरऐवजी फ्यूअल इंजेक्शन फ्यूलिंग सिस्टिमचाही समावेश आहे.

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
an Old uncle and a young boy inside Delhi metro over seat issues
“रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

आणखी वाचा – आता आली ‘हीरो’ची HF डीलक्स , मिळणार अधिक मायलेज

किंमत –
-सीबीएससह ड्रम ब्रेक व्हेरिअंट – 64,800 रुपये
-सीबीएससह ड्रम ब्रेक-अ‍ॅलॉय व्हील व्हेरिअंट- 66,800 रुपये
-सीबीएससह डिस्क ब्रेक व्हेरिअंट- 67,800 रुपये
-स्पेशल एडिशन सीबीएससह ड्रम ब्रेक-अ‍ॅलॉय व्हील व्हेरिअंट- 68,500 रुपये
-स्पेशल एडिशन सीबीएससह डिस्क ब्रेक व्हेरिअंट – 69,499 रुपये