‘टाईमपास’ करण्याची पद्धत पिढीनुसार बदलत असतेच.. मग तो कॉलेजियन्सचा कट्ट्याच्या कडेला उभा राहून कडक ‘टी’ (चहा) घेत केलेला ‘टी फॉर टाईमपास’ असो वा.. आजी-आजोबांनी बागेत मारलेला फेरफटका आणि इतर ज्येष्ठ मित्र-मैत्रिणींसोबत मारलेल्या काळापडद्याआड गेलेल्या गोष्टींवरील गप्पा. प्रत्येकजण आपला टाईमपास वेगवेगळ्या माध्यामातून करत असतोच..
पण, या टाईमपासचं रुपडं ही आता तंत्रज्ञानाच्या जगात पालटलंय. हो..कॉलेजच्या बाहेर आपला कट्टा शोधून तेथे गप्पाटप्पा रंगवणारी तरुण पिढी आता जास्तवेळ ‘वॉट्सअॅप’वरील ‘स्टेट्स’ विनाकारण ‘अपडेट’ आपला टाईमपास करू लागली आहे. तोंडी रंगणाऱया गप्पांचे स्थान ‘वॉट्सअॅप’वरील ‘टेक्स्ट’ने घेतले आहे. यावरूनच टाईमपास करण्याचे अमर्याद स्वरूप लक्षात येते. कारण, फक्त पद्धत बदलतेयं हेतू नाही..हेतू मात्र, तोच निव्वळ टाईमपास.
वेळ जात नसेल आणि तो घालवायचा असेल, तर मित्र-मैत्रिणींसोबत उगागच खरेदी करण्याचा हेतू नसला तरी, उठसूठ मॉलमध्ये ‘विंडो शॉपिंग’च्या नावाखाली ‘एसी’च्या थंडगार वाऱयात निवांत दोन-तीन तास घालविणारी तरूणपिढी आता..फ्लिपकार्ट, ओएलएक्स, फेसबुक अशा सोशल नेटवर्कींमध्ये टाईमपास करण्याला जास्त पसंती देत आहे. पण..हेतू तोच निव्वळ टाईमपास.
सहलीला गेल्यानंतर त्याठीकाणचे सौंदर्य़ आणि माहिती जाणून घेण्याचा, निसर्गसौंदर्य डोळ्यात भरून घेण्याऐवजी, ऐ..जरा चांगला फोटो काढ कव्हरपेजला छान दिसला पाहिजे. असे म्हणून योग्य तसा फोटो (कव्हरपेजसाठी) काढण्यात गुंतून आताची तरुणपिढी वेळ घालवू लागली आहे. पण..हेतू तोच निव्वळ टाईमपास